भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने अंपायरसोबत गैरवर्तन केले होते. त्याच्या या कृतीवर सर्व क्रिकेट स्तरातून टीका करण्यात आली होती.नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पेनला आपल्या असभ्य कृतीबद्दल एकूण सामन्यातील 15% मानधनाचा दंड ठोठावण्यात आला आहे.
पेनने भारताच्या पहिल्या डावात पुजारा विरुद्ध घेतलेल्या एका रिव्ह्यू संदर्भात अंपायरशी वाद घातला होता. लायनच्या एका चेंडूवर पुजारा फसला व चेंडू शॉर्ट लेग वरील खेळाडूने पकडला. यावेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात अपिल करूनही अंपायरने पुजाराला नाबाद घोषित केले. यानंतर टीम पेनने रिव्ह्यू घेतला मात्र त्यात पुन्हा एकदा पुजाराला नाबाद घोषित करण्यात आले.
अंपायरांच्या या निर्णयावर पेन चांगलाच नाराज झालेला दिसला. पेनच्या मते जेव्हा चेंडू बॅटच्या जवळून गेला तेव्हा स्निको मध्ये थोडीशी हालचाल जाणवली होती. पेनने कठोर शब्दात नाराजी व्यक्त करत, मेलबर्न येथे मला असेच बाद दिले गेले होते याची आठवनही अंपायरला करून दिली.
पेनला आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले आहे व त्याला सामना मानधनातील 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. याच यासोबत पेनच्या खात्यात एक डीमेरिट गुण देखील जोडला गेला आहे. पेनने आपला गुन्हा आणि दंड स्वीकारल्यामुळे या प्रकरणात औपचारिक सुनावणीची केली गेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
“लक्षात असूद्या हा कसोटी सामना आहे”, टीकेचा धनी ठरलेल्या पुजाराच्या मदतीला धावून आला भारतीय क्रिकेटर
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी: दीपक हुडा-कृणाल पंड्या वादाची बडोदा क्रिकेट संघटना करणार चौकशी
टी-१० फॉरमॅटमुळे क्रिकेटपटूंची कारकीर्द वाढू शकेल, ड्वेन ब्राव्होने मांडले मत