वेस्ट ऑगस्टा संघातील जोश डस्टन या खेळाडूने एकाच सामन्यात तब्बल ४० षटकार मारायची कामगिरी केली आहे. ३५ षटकांच्या या सामन्यात सेंट्रल स्टर्लिंग संघाविरुद्ध खेळताना त्याने तब्बल ३०७ धावा केल्या.
त्याच्या वेस्ट ऑगस्टा संघाने संपूर्ण सामन्यात ३५४ धावा केल्या तर त्यातील जोश डस्टनने एकट्याने तब्बल ८६.७२% अर्थात ३०७ धावा केल्या.
सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी एका सामन्यात सार्वधिक % धावा करायचा विक्रम केला होता. त्यांनी संघाच्या धावांपैकी ६९.४८ % धावा १९८४ साली केल्या होत्या.
जोश डस्टनचे अन्य सहकारी एकही धाव न करता माघारी परतले. त्यानंतर संघातील दुसऱ्या खेळाडूच्या सर्वाधिक धावा १८ अशा होत्या.
जोश डस्टनने ७व्या विकेटसाठी तब्बल २०३ धावांची भागीदारी केली. त्यात त्याचा जोडीदार बेन रुसेलने केवळ ५ धावांचा योगदान दिले होते.
या खेळीत त्याने ९ चौकरही मारले हे विशेष. यावेळी स्कोरबोर्डवर त्याने किती चेंडूत हे त्रिशतक केले हे लिहिले नव्हते. परंतु सामनाच ३५ षटकांचा असल्यामुळे त्याच्या जबदस्त स्ट्राइक रेटचा अंदाज येतो.