ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या चार सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत भारतीय संघाने पहिल्या तीन सामन्यांनतर 2-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांनी ऑस्ट्रेलिया संघात सिडनी येथे होणाऱ्या शेवटच्या कसोटीसाठी काही बदल सुचवले आहेत.
असाच बदल ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टिव्ह वॉ यांनी देखील सुचवला असून त्यांनी सिडनी कसोटीसाठी त्यांचा ऑस्ट्रेलियाचा 11 जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघातून त्यांनी ऍरॉन फिंचला वगळले आहे. त्यांनी या 11 जणांच्या संघाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
या संघात त्यांनी फिंचच्या ऐवजी मार्कस हॅरिस बरोबर शॉन मार्शला सलीमीवीर म्हणून ठेवले आहे. तसेच मार्नस लाबसशानेला संघात स्थान दिले आहे. हा संघ इंस्टाग्रामवर शेअर करताना त्यांनी कॅप्शन दिले आहे की ‘सिडनी कसोटीसाठी निवड झालेल्या संघातून असा असेल माझा संघ’
https://www.instagram.com/p/BsCIQI8FH1W/?fbclid=IwAR3T182fKBemqVy0WvHoqI0vHdGaHenipHCxT9POR6qXM2Ed4X_xCbWrgXg
मात्र वॉ यांच्या पोस्टबद्दल कमेंट करत भारताचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुलीने ऑस्ट्रेलियाच्या निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला आहे.
त्याने वॉ यांनी टाकलेल्या ऑस्ट्रेलियाच्या 11 जणांच्या संघाचा फोटो ट्विटरवर शेअर करत ट्विट केले आहे की ‘ऑस्ट्रेलिया क्रिकेटची निवडीचा दर्जा सर्वात खाली गेला आहे. दिग्गजांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी संघातील खेळाडूंची नावे इंस्टाग्रामवर पोस्ट करावी लागत आहेत.’
Australian cricket selection at its lowest ever .. greats have to put teams in their Instagram posts to give direction …. pic.twitter.com/yMnmXHdIfO
— Sourav Ganguly (@SGanguly99) December 31, 2018
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील सिडनीमध्ये होणारा शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारी 2019पासून सुरु होणार आहे. हा सामना जर भारताने जिंकला किंवा अनिर्णित राहिला तर भारत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास रचणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–टाॅप ५- २०१८मध्ये क्रिकेटमध्ये काही होऊ न शकलेले विक्रम
–टाॅप ५- टी२०मधील २०१८ वर्षातील गमतीशीर आकडेवारी
–Video- यावर्षी टीम इंडियाच्या शिलेदारांचा हा व्हिडीओ झाला सर्वाधिक व्हायरल
–स्म्रीती मानधना ठरली २०१८ ची आयसीसीची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू