fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

टाॅप ५- टी२०मधील २०१८ वर्षातील गमतीशीर आकडेवारी

मुंबई | आज २०१८ वर्षातील शेवटचा दिवस. हे वर्ष टीम इंडियासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खास ठरले. संघ तसेच खेळाडूंनी अनेक विक्रम केले. परदेशातही कसोटी तसेच टी२०मध्ये विजय मिळवले.

अशा या खास वर्षीतील टी२०मधील काही खास आकडेवारी- 

– भारताने यावर्षी १९ टी२० सामने खेळले असून त्यातील १४ सामने जिंकले. ४ सामन्यात संघाला पराभव पहावा लागला तर एका सामन्यात कोणताही निकाल लागला नाही.

– यावर्षी टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शिखर धवन (१८ सामन्यात ६८९ धावा) अव्वल तर १९ सामन्यात ५९० धावांसह रोहित दुसऱ्या स्थानावर आहे.

-यावर्षी टी२०मध्ये फलंदाजांनी ७ शतके केली. त्यात रोहितने एकट्याने २ शतके केली.

-यावर्षी टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माने २२३७ धावांसह पहिल्यांदाच दुसऱ्या स्थानी झेप घेतली.

-ऑकलंड टी२०मध्ये न्यूझीलंड संघाने ठेवलेले २४४ धावांचे लक्ष ऑस्ट्रेलिया संघाने पार केले. हे कोणत्याही टी२०मध्ये पार केलेले सर्वाधिक लक्ष्य ठरले.

-अॅराॅन फिंचने यावर्षी आंतरराष्ट्रीय टी२०मधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडला. त्याने स्वत:च केलेला १५६ धावांचा विक्रम मोडत १७२ धावांचा नवा विक्रम केला. त्याने ही धावसंख्या हरारे स्टेडियमवर झिंबांब्वे संघाविरुद्ध केली.

-यावर्षी टी२०मध्ये दोन शतके करत आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ४ शतके करणारा रोहित शर्मा जगातील पहिला खेळाडू ठरला.

-यावर्षी शोयब मलिकने टी२० कारकिर्दीतील १०० सामने खेळण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला. सध्या त्याच्या नावावर १०८ टी२० सामने असून दुसऱ्या स्थानावर शाहिद आफ्रिदी असून त्याने ९९ सामने खेळले आहे.

– यावर्षी शेवटचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळलेल्या शाहिद आफ्रिदीचे दोन मोठे विक्रम हुकले. १०० सामने खेळणारा पहिला खेळाडू होण्यासाठी त्याला केवळ १ सामन्याची गरज होती. परंतु त्याने ९९ सामनेच खेळले. तर टी२०मध्ये १०० विकेट्स घेणारा पहिला खेळाडू होण्यासाठी त्याला शेवटच्या सामन्यात ३ विकेट्सची गरज होती परंतु तो एकच विकेट घेऊ शकला.

महत्त्वाच्या बातम्या:

Video- यावर्षी टीम इंडियाच्या शिलेदारांचा हा व्हिडीओ झाला सर्वाधिक व्हायरल

स्म्रीती मानधना ठरली २०१८ ची आयसीसीची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू

मेलबर्न कसोटीतील विजयामुळे टीम इंडियाला झाला मोठा फायदा

-‘बाप’माणूस रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर

भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटवर प्रश्न उभा करणाऱ्यांना कर्णधार कोहलीने दिले सडेतोड उत्तर, पहा व्हिडिओ

You might also like