---Advertisement---

क्रिकेटमध्ये 9 वर्षांपूर्वी घडली होती ‘ती’ वाईट घटना, ज्यामुळे हेलावले होते संपूर्ण क्रिकेटजगत

On: सोमवार, नोव्हेंबर 27, 2023 10:39 AM
---Advertisement---

आजच्याच दिवशी (27 नोव्हेंबर) 9 वर्षांपूर्वी सीन एबॉट या गोलंदाजाच्या एका खतरनाक बाउंसरने डोक्याचा वेध घेतल्यामुळे फिलिप ह्यूजेस या ऑस्ट्रेलियाच्या प्रतिभावान खेळाडूला आपले प्राण गमवावे लागले होते.

सन 2014 मध्ये शेफील्ड शील्ड स्पर्धेत फलंदाजी करत असलेल्या 25 वर्षीय फिलिप ह्यूजेस (Phillip Hughes) याला सीन एबॉट (Sean Abbott) याने टाकलेला चेंडू लागला आणि तो जमिनीवर कोसळला. फलंदाजी दरम्यान ह्यूजेसने हेल्मेट परिधान केले होते पण चेंडू मानेच्या जवळ लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता.

त्याला या दुखापतीनंतर लगेचच स्ट्रेचरवरुन मैदानातून बाहेर नेण्यात आले होते तसेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण अखेर दुखापत झाल्याच्या तीन दिवसांनंतर 27 नोव्हेंबरला त्याने अखेरचा श्वास घेतला.

विशेष म्हणजे त्याचे निधन झाल्यानंतर 3 दिवसांनी म्हणजेच 30 नोव्हेंबरला त्याचा 26 वा वाढदिवस होता. त्याच्या निधनाने सारे क्रिकेट जगत हेलावले होते.

त्याच्या निधनामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेन येथे 4 डिसेंबर पासून सुरु होणारा पहिला कसोटी सामनाही पुढे हलवण्यात आला होता. हा सामना नंतर 9-13 डिसेंबर दरम्यान ऍडलेड येथे पार पडला. या सामन्याआधी ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या खेळाडूंनी ह्यूजला श्रद्धांजली वाहिली होती.

ह्यूजेसची कारकिर्द – 
ह्यूजेसने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 26 कसोटी आणि 25 वनडे सामने खेळले होते. यामध्ये त्याने कसोटीत 3 शतके आणि 7 अर्धशतकांसह 1535 धावा त्याने केल्या होत्या. तर वनडेमध्ये त्याने 2 शतके आणि 4 अर्धशतकांसह 826 धावा केल्या होत्या.

हेही वाचा-
यशस्वी, ऋतुराज अन् इशानचा भीमपराक्रम, भारताने जागतिक क्रिकेटमध्ये घडवला इतिहास; बनला फक्त पाचवा संघ
रिंकूची विस्फोटक फलंदाजी पाहून कॅप्टन सूर्याला आली ‘या’ दिग्गजाची आठवण; म्हणाला, ‘सर्वांना माहितीये…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---