---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच्या घातक वेगवान गोलंदाजाचे ६ वर्षानंतर ‘या’ मोठ्या टी२० लीगमध्ये पुनरागमन

On: मंगळवार, नोव्हेंबर 10, 2020 7:49 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क ६ वर्षानंतर बिग बॅश लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. आगामी हंगामात त्याने सिडनी सिक्सर्स संघासोबत करार केला असून तो खेळताना दिसणार आहे. भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी निवड झाल्याने तो बीबीएलचे केवळ शेवटचे तीन लीग सामने खेळण्यास उपलब्ध होऊ शकतो.

“बिग बॅश लीगची मी वाट पाहत असून यात पुनरागमन करताना आनंद वाटत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट खेळण्याची ही योग्य वेळ आहे आणि या स्पर्धेत खेळल्यानंतर कशा पद्धतीचे क्रिकेट इथे असते याचा आपल्याला अंदाज येतो. मागील हंगामात स्टिव्ह स्मिथ आणि जॉश हेजलवूड यांना खेळताना पाहिले होते. आता मी देखील या हंगामात खेळण्यास उत्साहित आहे,” असे स्टार्क म्हणाला.

“मी आधीही सिडनी संघाकडून खळलो होतो. माझी पत्नीदेखील याच संघाचा भाग आहे. या संघात पुनरागमन करून मला आनंद होत आहे,” असे स्टार्क म्हणत आहे.

मेलबर्न स्टार्स कडून खेळणार जॉनी बेयरस्टो
इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉनी बेयरस्टो देखील आगामी हंगामात बीबीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. बेयरस्टो मेलबर्न स्टार्स या संघाकडून खेळणार आहे. या स्पर्धेत खेळणारा तो इंग्लंडचा १० वा खेळाडू असणार आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर तो ख्रिसमस संपताच संघाशी जोडला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘हिटमॅन’ रोहित शर्माची बायोग्राफी झाली लाँच, जाणून घ्या सविस्तर

-कोहलीला RCBची कॅप्टन्सी सोड म्हणण्यामागे गंभीरचा ७ वर्षांपुर्वीचा राग ? अंपायरपर्यंत गेले होते प्रकरण

-RCB आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर विराटने बदललं वास्तव्य; पाहा काय आहे कारण

ट्रेंडिंग लेख-

-RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत

-मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ

-आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---