ऑस्ट्रेलियाच्या महान क्रिकेटर रिकी पाँटिंगने दिलेल्या एका वक्तव्यावरुन क्रिकेट विश्व हदरले आहे. ऑस्ट्रेलिया संघासाठी आपल्या कर्णधारपदात 2 वेळा विश्वचषक जिंकून देणाऱ्या रिकी पाँटिंगने भारतीय क्रिकेट मधील पुढील सुपरस्टार कोण होणार? यावर भविष्यवाणी केले आहे. रिकी पाँटिंगच्या या विधानाने क्रिकेटप्रेमींमध्ये खळबळ उडाले आहे.
टी20 विश्वचषकाच्या विजयानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता भारतीय संघ या फॉरमॅटमध्ये युवा खेळाडूंसोबत खेळताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत पॉन्टिंगने अशा खेळाडूबद्दल सांगितले आहे, जो भविष्यात या महान खेळाडूंसारखा सुपरस्टार बनेल आणि जागतिक क्रिकेटवर राज्य करेल.
रिकी पाँटिंगच्यामते, आयपीएल मध्ये चेन्नई सुपरकिंगस संघाचे नेतृत्व करणारा ऋतुराज गायकवाड भारतीय क्रिकेट मधील येत्या काळात सुपरस्टार बनेल. वास्तविक, अलीकडेच झालेल्या भारत विरुद्ध झिम्बाब्वे मालिकेमध्ये ऋतुराज गायकवाडने 66.50 च्या सरासरीने आणि 158.33 च्या स्ट्राइक रेटने 133 धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाडला विराट कोहलीचे रिप्लेसमेंटच्या स्वरुपात पहिले जात आहे.
ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत भारतासाठी 23 टी20 सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने 633 धावा केल्या आहेत. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऋतुराजने ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक झळकावले आहे. त्याच्या नावे एक शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. तर दुसरीकडे गायकवाडने आयपीएल मध्ये एकूण 66 सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने 2380 धावा केल्या आहेत. तर आयपीएल मध्ये त्याने 2 शतके आणि 18 अर्धशतके ठोकले् आहेत. कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडने भारतीय संघाचे अशियन गेम्समध्ये नेतृत्व केले आहे. तर ऋतुराजने आयपीएलमध्ये 2024 च्या हंगमात चेन्नई सुपरकिंग्ज संघाची धुरा सांभळली होती.
महत्तवाच्या बातम्या-
ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकीचा सुवर्ण इतिहास, जाणून घ्या आतापर्यंत किती पदकं जिंकली
IND VS SL: कर्णधार म्हणून सूर्याचीच हवा, तर हार्दिक पांड्या जवळपासही नाही, पाहा कॅप्टन म्हणून दोघांची कामगिरी
टीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची गोळ्या झाडून हत्या