आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी 5 सप्टेंबर रोजी घोषित झालेल्या 15 सदस्यीय भारतीय संघाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. या संघाविषयी चाहत्यांपासून ते आजी-माजी क्रिकेटपटूंपर्यंत सर्वांनी आपापली मते मांडली. यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे माजी अष्टपैलू टॉम मूडी यांच्या नावाचाही समावेश होता. त्यांनी भारताच्या विश्वचषक संघाविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भारताच्या एका खेळाडूचे नाव घेत म्हटले, की त्याला संघात घेण्याचा निर्णय योग्य नाहीये.
टॉम मूडी (Tom Moody) यांनी म्हटले, की भारताचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यालाही विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेसाठी भारतीय संघात सामील केले आहे, जो योग्य निर्णय नाहीये. त्यांच्या मते, सूर्याची या संघात जागा बनत नाही. तो खूपच नशीबवान आहे, की त्याला विश्वचषक संघात जागा मिळाली आहे.
सूर्यकुमार यादव याच्याविषयी बोलायचं झालं, तर वनडे सामन्यांमध्ये त्याचे प्रदर्शन तितके चांगले राहिले नाहीये. आतापर्यंत मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात तो अपयशी ठरला आहे. मात्र, टी20 क्रिकेटमध्ये त्याने जबरदस्त खेळी साकारत स्वत:ला सिद्ध केले आहे. तरीही, वनडे क्रिकेटमध्ये त्याच्याकडून संघाला चांगल्या प्रदर्शनाची आशा आहे. त्यामुळेच अनेक जाणकारांच्या मनात हा प्रश्न होता, की सूर्याला वनडे संघात सामील केले पाहिजे की नाही.
‘तिलक वर्मा होता चांगला पर्याय’
टॉम मूडी यांच्या मते, सूर्यकुमारच्या ऐवजी तिलक वर्मा (Tilak Varma) याची वनडे विश्वचषकाच्या संघात निवड झाली पाहिजे होती. मूडी म्हणाले, “सूर्यकुमार यादव लकी आहे की त्याला संघात जागा मिळाली. कारण, तिलक वर्माच्या रूपात एक चांगला पर्याय होता, जो फलंदाजी फळीत डावखुऱ्या फलंदाजीचा पर्याय देतो. याव्यतिरिक्त तो पार्ट टाईम फिरकी गोलंदाजीही करतो. त्यावेळी ईशान किशनबाबत एवढी चर्चा झाली नसती. याचा अर्थ असा नाही, की दोघे एकसोबत खेळू शकत नाहीत. मात्र, रोहित शर्मा ज्याबाबत सातत्याने बोलत आहे, त्याची ती समस्या दूर झाली असती.”
खरं तर, तिलक वर्मा याने अलीकडेच भारताच्या आयर्लंड दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. मात्र, त्याचे प्रदर्शन उल्लेखनीय राहिले आहे. असे असूनही त्याला वनडे विश्वचषक संघात सामील केले गेले नाहीये. (australian former cricketer tom moody not agree with suryakumar yadav s selection in india s 2023 world cup squad)
हेही वाचाच-
भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा सुरू होणार द्विपक्षीय मालिका? बीसीसीआय अध्यक्षांनी केले मोठे विधान
कशी नशिबाने थट्टा आज मांडली! PAKvsBAN लाईव्ह सामन्यात गेली पाकिस्तान स्टेडिअममधील लाईट, जगदुनियेत होतंय हसू