---Advertisement---

वनडे क्रिकेटबाबत सूर्यकुमारचा मोठा दावा! आशिया चषकात सुटणार चांगल्या फॉर्मचे कोडे

Suryakumar Yadav
---Advertisement---

भारतीय संघाचा ताबडतोड फलंदाज अशी ओळख अससेला सूर्यकुमार यादव आशिया चषक 2023च्या तयारीत आहे. सूर्यकुमार यादवने भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. मात्र, वनडे प्रकारात त्याला अद्याप कमाल दाखवता आली नाहीये. असे असले तरी, आगामी आशिया चषकात तो या प्रकारात चांगल्या प्रदर्शनाचा प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रिया सूर्यकुमारने दिली.

भारतीय संघाला आशिया चषकातील आपला पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी जयमान पाकिस्तानसोबत खेळायचा आहे. तत्पूर्वी 30 ऑगस्ट रोजी पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील सामन्याने आशिया चषकाची सुरुवात होईल. सूर्यकुमार यादव () याचे नाव भारतीय संघाकडून विश्वचषक 2023 विचारात घेतले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आशिया चषकातही त्याला संधी दिली गेली आहे. असे असले तरी, आशिया चषकात त्याला आपले वनडे प्रकारातील प्रदर्शन सुधारण्याची गरज आहेस. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याला प्रश्न विचारले गेले.

सूर्यकुमार यादव म्हणाला, “जो रोल मला दिला जाईल, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न मी करेल. जर माझी भूमिका बदलली, तर त्यासाठीही मी तयार असेल. हा एक असा प्रकार आहे, ज्यामध्ये मी पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. लोक म्हणतात, टी-20 देकील व्हाईट बॉल क्रिकेट आहे आणि वनडे देखील व्हाईट बॉल क्रिकेट आहेत, तर वनडे क्रिकेटचे कोडे का सुटत नाहीये. मी या फॉरमॅटमध्ये चांगल्या प्रदर्शनासाठी सराव करत आहे. माझ्या मते हा सर्वात आव्हानात्मक फॉरमॅट आहे. कारण यामध्ये तुम्हाला तिन्ही फॉरमॅटप्रमाणे खेळावं लागतं. सुरुवात दमाने करावी लागते, नंतर चांगल्या पद्धतीने स्ट्राईक रोटेट करावी लागते आणि शेवटी टी-20 प्रमाणे खेळावे लागते.”

सूर्यकुमारने पुढे असेही सांगितले की, तो वनडे प्रकारात चांगल्या प्रदर्शनासाठी राहुल द्रविड, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे सल्ले घेत आहे. सूर्यकुमार म्हणाला, “वनडे प्रकारात संतुलन राखणे गरजेचे आहे. मी त्यासाठी खूप सरव आणि चर्चा करत आहे. याविषयी मी राहुल द्रविड सर, रोहित शर्मा आणि विराट कोहली भाऊशी चर्चा करतो. आशा आहे की आशिया चषकात वनडे प्रकाराचे कोडे सुटेल.”

दरम्यान, सूर्यकुमार यादव याची टी-20 आंतरराष्ट्रीय आणि वनडे प्रकारातील आकडेवारी पाहिली, तर मोठी तफावत आहे. सूर्यकुमारने 53 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 46.02ची सरासरी आणि 172.7च्या स्ट्राईक रेटने 1841 धावा केल्या आहेत. वनडे प्रकारात त्याने 26 सामन्यांमध्ये 24.33च्या सरसरीने आणि 101.39च्या स्ट्राईक रेटने 511 धावा केल्या आहेत. (Suryakumar’s big claim about ODI cricket! The puzzle of good form will be solved in the Asia Cup 2023)

महत्वाच्या बातम्या – 
‘मला वाटले म्हणून काहीही करता येत नाही’, चहलसारख्या खेळाडूंचा प्रश्न विचारताच कर्णधार रोहित स्पष्ट उत्तर
गुड न्यूज! रिषभ पंत करू लागला सायकलिंग, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार वॉर्नरची कमेंट चर्चेत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---