टोकियो ऑलिम्पिकमध्ये सोमवारचा दिवस भारतीय हॉकीसाठी मोठा आनंद घेऊन आला. सोमवारी (२ ऑगस्ट) भारतीय महिला हॉकी संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला हॉकी संघ यांच्यात चुरशीचा उपांत्यपूर्व सामना झाला. या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघावर भारतीय संघाने १-० ने विजय मिळवला. याच विजयासह भारतीय संघाने ऑलिम्पिक इतिहासात उपांत्य फेरीत पहिल्यांदाच आपले स्थान निश्चित केले आहे.
भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर जगाच्या कानाकोपऱ्यातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. याचबरोबर भारतामधील ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त बॅरी ओ फेरेल यांनी देखील भारतीय महिला हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, ‘हा एक चुरशीचा हॉकी सामना होता. परंतु, तुमचा बचाव शेवटपर्यंत टिकून राहिला. सविता पुनिया, ‘ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ चा पराभव होऊ शकला नाही! उपांत्य फेरी आणि भव्य अंतिम फेरीसाठी शुभेच्छा.’
Well done @TheHockeyIndia 🇮🇳!! Was a tough #Hockey match, but your defence held out until the end. @savitahockey, the 'Great Wall of India' – could not be beaten! Best of luck in the semi & grand finals.
#TeamIndia #TokyoTogether #IndiaKaGame https://t.co/ZftxM0mUtY pic.twitter.com/eqai47XR0g— Philip Green OAM (@AusHCIndia) August 2, 2021
या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली होती. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले होते. पहिल्या क्वार्टरच्या समाप्तीनंतर स्कोर ०-० असा होता. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरच्या २२ व्या मिनिटात भारतीय संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. ही संधी भारतीय संघाने चुकवली नाही. मिळालेल्या संधीचे सोने करत गूरजीत कौरने पहिला गोल केला आणि भारतीय संघाला १-० ची आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर ही आघाडी भारतीय महिला संघाने कायम राखत ऑस्ट्रेलियाला गोल करण्यापासून रोखले. यात गोलरक्षक सविता पुनियाने मोलाचे योगदान दिले. त्यामुळे भारतीय महिला संघाने पहिल्यांचा उपांत्य फेरी गाठण्याचा इतिहास रचला. आता भारताचा उपांत्य फेरीतील सामना ४ ऑगस्ट रोजी अर्जेंटिनाविरुद्ध होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७ वाजता सुरु होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्माने ‘ती’ पोस्ट करत इंग्लंडला कसोटी मालिकेपूर्वी दिली वॉर्निंग?
सेमीफायनलसाठी भारताचे हॉकी संघ सज्ज; जाणून घ्या कधी आणि केव्हा होणार सामने
‘अविस्मरणीय क्षण!’, भारतीय महिला हॉकी संघावर ऐतिहासिक विजयानंतर कौतुकाचा वर्षाव, पाहा काही खास ट्विट