ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (australia vs england) यांच्यात सध्या ऍशेस मालिका (ashes series) खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेन येथील गाबा स्टेडियमवर खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ऍशेस मालिकेतील दुसरा सामना एडिलेडमध्ये १६ डिसेंबर पासून खेळला जाणार आहे. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलिया संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
ऑस्ट्रेलिया संघाचा महत्वाचा वेगवान गोलंदाज जोस हेजलवूड (Josh Hazelwood) दुसऱ्या सामन्यात सहभागी होऊ शकणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. हेजलवूडला दुसऱ्या सामन्यात सहभागी न होण्यामागे दुखापतीचे कारण सांगितले गेले आहे. तत्पूर्वी, त्याने ऍशेसच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात दोन आणि दुसऱ्या डावात एक महत्वाची विकेट घेतली होती. आता दुसऱ्या सामन्यासाठी हेजलवूडच्या जागी झाय रिचर्डसन (Jhye Richardson) याला संधी दिली जाणार आहे. संघातील खेळाडूंच्या अप्रतिम प्रदर्शनामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात ९ विकेट्स राखून विजय मिळवला होता.
दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्याचा विचार केला, तर सामन्याच्या पहिल्या डावापासून ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडवर वर्चस्व निर्माण केले होते. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंड संघ अवघ्या १४७ धावांवर सर्वबाद झाला होता. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा नवीन कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या होत्या, तर मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात देखील गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले आणि शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अवघ्या २० धावांची आवश्यकता होती. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या दिवशी हे लक्ष्य एक विकेटच्या नुकसानावर अवघ्या ५.१ षटकात गाठले.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये खेळला जाणारा ऍशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना डे नाइट टेस्ट असणार आहे. त्याचसोबत मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना देखील डे नाइट टेस्ट असेल. हा सामना जानेवारी महिन्याच्या १४ तारखेपासून होबार्टमध्ये खेळला जाईल. तसेच मालिकेतील तिसरा सामना मेलबर्नमध्ये २६ डिसेंबरपासून खेळला जाईल, तर चौथा सामना ५ जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळला जाईल.
महत्वाच्या बातम्या –
“… म्हणून तो स्पेशल”, गांगुलीने सांगितली द्रविडची खासीयत
ईस्ट बंगालला हवीय नशीबाची साथ; केरळा ब्लास्टर्सविरुद्ध लागणार कसोटी
टीम इंडियासाठी २०२१ वर्ष राहिलंय दुर्देवी, ऐतिहासिक विजय तर मिळवलेच पण २ आयसीसी ट्रॉफीही गमावल्या