भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. २७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेने दौऱ्याचा शुभारंभ होईल. दोन्ही संघातील खेळाडू सरावादरम्यान चांगलाच घाम गाळत आहेत. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक जस्टीन लॅंगर याने, आगामी मालिकेसाठी आपला संघ तयार असल्याचे म्हटले आहे.
आमचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यासाठी तयार
वनडे मालिकेला २७ तारखेपासून सिडनी येथे सुरुवात होत आहे. त्याआधी, ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक जस्टीन लॅंगर याने कॉन्फरन्स कॉलद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. भारतीय गोलंदाजांविषयी प्रश्न विचारला असता तो म्हणाला, “भारतीय गोलंदाजी खरोखरच तगडी आहे. आम्ही त्यांचा सन्मान करतो. मात्र, आमच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांविरुद्ध खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. हाच अनुभव आगामी मालिकेत आमच्यासाठी फायद्याचा ठरेल.”
भारतीय गोलंदाजांचे केले कौतुक
लॅंगरने भारतीय गोलंदाजांचे कौतुक करताना म्हटले, “जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी जागतिक दर्जाचे गोलंदाज बनले आहे. सैनी आणि शार्दुल देखील चांगली कामगिरी करतायेत. आयपीएलमध्ये देखील त्यांची कामगिरी चांगली झाली होती. मात्र, या सर्वांचा सामना करण्यासाठी आमचे फलंदाज एकदम सज्ज आहेत. भारताच्या दर्जेदार आक्रमणाला तोंड देण्यासाठी आमचे फलंदाज कसून सराव करत आहेत. त्याचा परतावा ते प्रदर्शनातून देतील.”
वनडे मालिकेत खेळणार अनेक दिग्गज
मागील दोन वर्षात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १२ वनडे सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी ५ सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय मिळाला आहे. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून स्टीव स्मिथ, आरोन फिंच, डेविड वॉर्नर, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल सारखे आक्रमक फलंदाज खेळतील. दुसरीकडे, भारतीय संघ बुमराह, शमी, सैनी या वेगवान गोलंदाजांसह युजवेंद्र चहल, कुलदीप यादव व रवींद्र जडेजा या फिरकीपटूचा मैदानात उतरेल.
महत्त्वाच्या बातम्या –
“मी फॉर्ममध्ये आलोय !” ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे भारतीय संघाला आव्हान
“युवा खेळाडूंमध्ये स्पार्क दिसला नाही”, धोनीच्या वक्तव्यावर ऋतुराज गायकवाडने सोडले मौन
धक्कादायक ! रोहितच्या घरात कोरोनाचा शिरकाव; वडिलांना झालीय लागण ?
ट्रेंडिंग लेख
कसोटीतील हे तीन दिग्गज कधीच दिसणार नाहीत भारताच्या निळ्या जर्सीत?
वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करुन सोडणारे ३ भारतीय फलंदाज
बॅगी ग्रीन- कहाणी जगातील सर्वात प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन क्रिकेट कॅपची