ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथला त्याची क्रिकेट कारकिर्द संपण्यापुर्वी २ आव्हाने पूर्ण करायची आहेत. एक म्हणजे, त्याचा कट्टर दुश्मन असणाऱ्या इंग्लंड संघाला त्यांच्याच देशात पराभूत करायचे आहे. दूसरे म्हणजे, भारतीय संघाला त्यांच्याच देशात मात द्यायची आहे. Steve Smith Want To Beat India And England In Their Home Before Retirement
गतवर्षी झालेली ऍशेज मालिकेचतील अंतिम सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. त्यामुळे ५ सामन्यांची ही कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत सुटली होती. जर अंतिम सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला असता किंवा तो सामना अनिर्णित राहिला असता तर ती मालिका ऑस्ट्रेलियाने आपल्या नावावर केली असती. पण अंतिम सामन्यात इंग्लंडने बाजी मारली आणि मालिकेत बरोबरी साधण्यात यश मिळवले. स्मिथ अजूनही त्या पराभवाला विसरू शकला नाही.
असे असले तरी ही मालिका स्मिथसाठी खास ठरली होती. त्यावेळी स्मिथने ४ सामन्यात खेळताना ११०.५७च्या सरासरीने ७७४ धावा केल्या होत्या.
तसेच, स्मिथने २०१७ला भारत दौऱ्यातील कसोटी मालिकेत ३ शतके केली होती. तरीही विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला २-१ने पराभूत केले होते. स्मिथला त्या पराभवाचेही प्रत्युत्तर द्यायचे आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वेबसाइटशी बालताना स्मिथ म्हणाला की, “हे २ खूप मोठे डोंगर आहेत आणि त्यांना चढणे ही खूप विशेष गोष्ट असेल. आशा आहे की, मी हे दोन्ही डोंगर चढू शकेल. माझे वय वाढत आहे. मला माहित नाही की अजून किती वर्षे माझे क्रिकेट बाकी आहे. काही सांगता येत नाही की माझ्या भविष्यात काय असेल? पण, या गोष्टींचे लक्ष्य कायम असेल, हे निश्चित आहे.”
गतवर्षीच्या ऍशेस सीरीजविषयी बोलताना स्मिथ म्हणाला की, “ऍशेस सीरीजमध्ये खेळणे विशेष होते. पण, दुर्भाग्याने आम्ही सीरीज जिंकू शकलो नाहीत. आम्ही सीरीजच्या अंतिम टप्प्यावर होतोत आणि तेवढ्या शेवटी जाऊन आम्ही हरलो. वास्तवात आम्ही काहीच नाही जिंकले. माझ्या वैयक्तिक दृष्टीकोनातून पाहिले तर, माझे काम अजून पूर्ण झालेले नाही. तगडी टक्कर देऊनही पराभूत झाल्यामुळे तेवढा आनंद होत नाही.”
स्मिथने ऑस्ट्रेलिया संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्याने कसोटीत ७३ सामने खेळत ७२२७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २६ शतकांचा आणि २९ अर्धशतकांचा समावेश आहे. हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल की, स्मिथ निवृत्त होण्यापुर्वी इंग्लंड आणि भारतीय संघाला पराभूत करु शकेल का नाही?
महत्त्वाच्या बातम्या –
पुण्याच्या इब्राहिमची इंडियन रेसिंग चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत आघाडी
“टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू ३-४ पदके जिंकतील,” बजरंग पुनिया
ट्रेंडिंग लेख –
४ दिग्गज क्रिकेटर, जे मुंबई इंडियन्सकडून खेळताना ठरले फ्लॉप
वाढदिवस विशेष: अफाट लोकप्रियतेचा धनी ठरलेला पण तितकाच वादग्रस्त जेसी रायडर
आयपीएल २०२० – यंदा यूएईमध्ये हे ५ गोलंदाज जिंकू शकतात पर्पल कॅप