India vs England 2nd Test: भारतीय क्रिकेटमधील वरिष्ठ खेळाडू एकापाठोपाठ एक निवृत्त होत आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी20 आणि कसोटी या दोन्ही फाॅरमॅटला रामराम ठोकला आहे. (Virat Kohli Rohit Sharma retirement) तर, रविचंद्रन अश्विननेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर आता रवींद्र जडेजाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे; त्याने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अजूनही वनडे आणि कसोटी संघात खेळत आहे. या पार्श्वभूमीवर, एका माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने गौतम गंभीरला रवींद्र जडेजाच्या कारकिर्दीशी संबंधित एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. (Gautam Gambhir advice)
एका स्पोर्ट्स पॉडकास्टवर बोलताना ऑस्ट्रेलियन दिग्गज ब्रॅड हॅडिन म्हणाला की, रवींद्र जडेजाच्या कारकिर्दीचा कदाचित ऱ्हास सुरू झाला आहे. तो म्हणाला, “आपण रवींद्र जडेजाचा ऱ्हास पाहत आहोत का? मला मान्य आहे की तो भारतीय खेळपट्ट्यांवर खूप प्रभावी ठरतो आणि भारतीय खेळपट्ट्यांवर डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीचा सामना करणे किती कठीण आहे हे देखील मला माहीत आहे. पण मला वाटत नाही की तो आता फिरकीपटू म्हणून भारतीय संघासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.” ब्रॅड हॅडिनने सांगितले की, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादवला पाहणे अधिक आवडेल, जो विकेट घेण्यात अधिक प्रभावी ठरू शकतो. (Brad Haddin On Ravindra Jadeja)
ब्रॅड हॅडिनने एजबेस्टन येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठीही भारतीय संघाला सल्ला दिला. त्याचे मत आहे की, जर नितीश कुमार रेड्डी खेळत असेल, तर रवींद्र जडेजाऐवजी भारतीय संघाने आक्रमक फिरकीपटू म्हणजेच कुलदीप यादवकडे वळले पाहिजे. हॅडिनच्या मते, कुलदीप विशेषतः परदेशी दौऱ्यांवर जडेजापेक्षा अधिक प्रभावी ठरू शकतो. (Kuldeep Yadav over Jadeja)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना (2 जुलै) रोजी एजबेस्टन येथे खेळवला जाईल. लीड्स येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. पाचव्या दिवशी भारतीय संघ 371 धावांचे विशाल लक्ष्यही वाचवू शकला नाही. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे देखील महत्वाचे ठरेल. (Edgbaston Test match)






