भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार होता. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका होणार होती. परंतु कोविड-१९ ची परिस्थिती पाहता ही कसोटी मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. मंगळवारी (०२ फेब्रुवारी) क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विटरद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी निक हॉकले यांनी सांगितले की, “ऑस्ट्रेलिया संघ या महिन्याच्या शेवटी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार होता. परंतु सध्या दक्षिण आफ्रिकामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. तसेच कोरोनाच्या नविन विषाणूचे काही रुग्णही तिथे आढळले आहेत. त्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले की, “या दौऱ्याचे नियोजन करत असताना आम्ही दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला स्पष्ट केले होते की, क्रिकेट ऑस्ट्रेलिया या दौऱ्यासाठी जास्तीचा खर्च करण्यास तयार आहोत. परंतु तेथील परिस्थिती पाहता आम्हाला हा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे.”
JUST IN: Australia's proposed tour of South Africa has been postponed due to the coronavirus pandemic.#SAvAUS pic.twitter.com/n7ipPMmvXC
— ICC (@ICC) February 2, 2021
“हा निर्णय घेणे आमच्यासाठी सोपे नव्हते. या निर्णयाने आम्ही नक्कीच निराश आहोत. विशेषतः आंतरराष्ट्रीय क्रिकेट सध्याच्या काळात सुरु राहण्याची गरज पाहता आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेशी आमचे असलेले सलोख्याचे संबंध, सोबतच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आमचा सहभाग पाहता, हे अधिकच निराशाजनक आहे,” असे शेवटी हॉकले यांनी सांगितले
महत्त्वाच्या बातम्या-
“ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ‘ती’ गोष्ट कधीही विसरू शकणार नाही”, अजिंक्य रहाणेचा खुलासा
वाढदिवस विशेष: १४० किलो वजन असलेला क्रिकेटर, ज्याचे विराट कोहलीने बदलले आयुष्य
“येत्या १० वर्षात शुबमन गिलचं नाव जगातील सर्वोत्कृष्ट कसोटी सलामीवीरांमध्ये असेल”






