ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा सध्या वाईट काळ सुरू आहे, असे म्हणणे वावघे ठरणार नाही. २०१८ मध्ये झालेल्या बॉल टेंपरिंग प्रकरणाबाबत अजूनही खुलासे होत आहेत. नुकताच कॅमेरॉन बेनक्राफ्टने या प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. याबाबत ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड पुन्हा एकदा चौकशी करणार आहे. अशातच अजून एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचे धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आरोन समर्स याला सोमवारी (१७ मे) डार्विन न्यायालयात हजर करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियन मीडियाच्या वृत्तानुसार, समर्सकडून लहान मुलींच्या लैंगिक अत्याचाराशी संबंधित साहित्य जप्त केले गेले. तसेच समर्सच्या मोबाइलवर अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यावरून असे दिसते की त्याने किमान १० अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले. यासंबंधी आणखी व्हिडिओ आणि फोटोजचा शोध घेण्यात पोलिस व्यस्त आहेत.
आरोन समर्स हा बिग बॅश लीग स्पर्धेत होबार्ट हुरिकेंस संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याचबरोबर त्याने देशांतर्गत होणाऱ्या वनडे कपमध्ये तस्मानिया संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याला अजुनपर्यंत कुठल्याही प्रकारात ऑस्ट्रेलियन संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली नाहीये. २०१८ मध्ये त्याने तस्मानिया संघातून लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
एका अहवालात पोलिस अधिकाऱ्यांनी, क्रिकेटपटूच्या या कृत्याला घृणास्पद असे म्हटले आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, “अशा वृत्तीच्या लोकांच्या भयानक हेतूंची भीती न बाळगता अल्पवयीन मुलींना त्यांचे बालपण उपभोगता आले पाहिजे. नॉर्दर्न टेरिटरी जॉइंट-चाइल्ड एंटी शोषण टीम आमच्या समुदायातील सर्वात असुरक्षित लोकांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांसह कार्य करत राहील.”
आरोन समर्सची कारकीर्द
आरोन समर्सने आतापर्यंत एकूण ७ लिस्ट ए सामने खेळले आहेत. यात त्याला ५ गडी बाद करण्यात यश आले आहे. तसेच ३ टी-२० सामन्यात त्याला एकही गडी बाद करण्यात यश आले नाही. येणाऱ्या काळात त्याने कितीही चांगली कामगिरी केली असली तरीही त्याला आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळणे कठीण आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कमिन्सचं नाव ‘सँड’वर लिहा, ‘पेपर’वर नको; माजी भारतीय खेळाडूने अप्रत्यक्षपणे साधला निशाणा
“मला खर काय आहे ते माहीत आहे,” बॉल टेंपरींग प्रकरणात डेविड वॉर्नरच्या मॅनेजरचा मोठा खुलासा
भारताने जिथे विश्वचषक जिंकला, त्याच वानखेडे स्टेडियमचे तौक्ते वादळाने केले हाल; पाहा व्हायरल फोटो






