अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात गुरुवारपासून दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद 250 धावा केल्या आहेत.
त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या आॅस्ट्रेलियाची सुरुवातही अडखळत झाली आहे. त्यांनी 63 षटकातच 127 धावांवर 6 विकेट्स गमावल्या आहेत.
या सामन्यातील दुसऱ्या दिवशीचे पहिले सत्र सुरु झाले तेव्हा आॅस्ट्रेलिया 2 बाद 57 धावांवर खेळत होता. त्यावेळी पहिल्या सत्राच्या पहिल्याच षटकात अश्विनने मार्शला वाईडला चेंडू टाकून 2 धावांवर असताना त्रिफळाचीत केले.
यामुळे मार्शने 130 वर्षांचा जूना नकोसा असा विक्रम मोडला आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये सलग सहाव्या डावात एक आकडी धावसंख्येबर बाद झाला आहे. त्यामुळे तो असा विक्रम करणारा 1888 नंतरचा पहिलाच आॅस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे.
तो कसोटीमध्ये सिडनीत इंग्लंड विरुद्ध 11 महिन्यापूर्वी केलेल्या 156 धावांच्या शतकी खेळीनंतर सातत्याने धावा करण्यासाठी संघर्ष करत आहे. त्याने या खेळीनंतर 13 डावात फलंदाजी करताना 12.53 च्या सरासरीने फक्त 163 धावा केल्या आहेत. यातील 40 धावा ही त्याची सर्वोच्च खेळी होती.
या सामन्यात आॅस्ट्रेलियाचे अॅरॉन फिंच(0), मॅर्क्यूस हॅरिस(26), उस्मान ख्वाजा(28), शॉन मार्श(2), टीम पेन(5) हे फलंदाज पहिल्या डावात स्वस्तात बाद झाले आहेत. त्यांच्यापैकी फक्त पिटर हँड्सकॉम्बने 34 धावा करुन थोडीफार लढत दिली पण तोही लवकर बाद झाला.
भारताकडून 63 षटकापर्यंत अश्विनने 3, इशांत शर्माने 2 आणि जसप्रीत बुमराहने 1 विकेट घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: दुसऱ्या सत्रात आॅस्ट्रेलियाच्या ४ बाद ११७ धावा
–११ वर्षे आयपीएलशी जोडलेला हा व्यक्ती २०१९च्या आयपीएल लिलावात दिसणार नाही!
–चेतेश्वर पुजाराने या १० गोलंदाजांच्या चेंडूवर मारले आहेत षटकार