क्रिकेट सामन्यादरम्यान बऱ्याचदा लक्षवेधी घटना घडत असतात. खेळाडूंमधील छोटी-मोठी भांडणे, सहकारी फलंदाजाच्या चुकीमुळे धावबाद होणे आणि बरच काही. काहीवेळा तर गोलंदाजाच्या भेदक चेंडूमुळे फलंदाजाच्या बॅट तुटल्याच्याही घटना पाहायला मिळाल्या आहेत.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी२० सामन्यादरम्यानही (First T20I) अशीच घटना पाहायला मिळाली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज आवेश खान (Avesh Khan) याच्या भेदक यॉर्करमुळे दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रॅस्सी वॅन डर डूसेन (Rassie van der dussen) याच्या बॅटचे २ तुकडे (Avesh Breaks Dussen Bat) झाले. या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर २११ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या डावादरम्यान १४ व्या षटकात हा प्रसंग घडला. भारताकडून वेगवान गोलंदाज आवेश हे षटक टाकण्यासाठी आला होता. तर दक्षिण आफ्रिकेकडून डूसेन स्ट्राईकवर होता. या षटकातील तिसरा चेंडू आवेशने यॉर्कर टाकला, ज्यावर डूसेनने कव्हरच्या दिशेला फटका मारला. आवेशने फेकलाल हा यॉर्कर इतका भेदक होता की, डूसेनची बॅट मधून चिरली.
Artist -Avesh Khan#INDvSA #Cricket pic.twitter.com/CI5LCVnEmG
— Jay Shah (@shah_ka_beta) June 9, 2022
यावेळी डूसेन २२ धावांवर खेळत होता. बॅटचे २ तुकडे झाल्याने नवीन बॅट मागवण्यात आली. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
दुसरीकडे नवीन बॅट मागलवल्यानंतर मात्र डूसेनने नवीन बॅटने तडकाफडकी खेळी खेळत धावा जोडल्या. डूसेन ४६ चेंडूत नाबाद ७५ धावा करत संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. डूसेनबरोबरच डेविड मिलरनेही संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ३१ चेंडूत ५ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ६४ धावा त्याने केल्या. डूसेन आणि मिलरमध्ये १३१ धावांची अभेद्य भागीदारी झाली, जी भारताविरुद्ध भारतात टी२० क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकी फलंदाजांनी केलेली सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. या अभेद्य भागीदारीच्या जोरावरच पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट्सने हा सामना जिंकला आहे.
आता उभय संघातील पुढील अर्थात दुसरा टी२० सामना १२ जून रोजी कटक येथे होईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटच्या पंढरीत बरोबर ३५ वर्षांपुर्वी टीम इंडियाने पहिल्यांदा फडकवली होती विजयी पताका
इतकी हिंमत!! पंतला धावबाद करण्यासाठी रबाडाची चिटिंग, भर मैदानात भारतीय कर्णधाराला दिला धक्का