---Advertisement---

बापाचे स्वप्न मुलाने केले पूर्ण; भारतीय क्रिकेटमधील ही आहे मोठी घडामोड…

On: गुरूवार, फेब्रुवारी 6, 2020 6:53 PM
---Advertisement---

बुधवारी (5 फेब्रुवारी) बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचा मुलगा अविषेक दालमियाची (Avishek Dalmiya) बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या (कॅब) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्याचबरोबर बीसीसीआयचा अध्यक्ष (President of CAB) सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशीष गांगुलीचीही (Snehashis Ganguly) कॅबच्या सचिवपदी बिनविरोध निवड झाली आहे.

यामध्ये 38 वर्षीय अविषेक हा कॅबचा सर्वात युवा अध्यक्ष बनला असून तो कॅबचा 18वा अध्यक्ष (18th President of CAB) आहे.

यावेळी कॅबने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव, उपसचिव यांची नावे देत त्यांचा फोटोही शेअर केला आहे.

https://twitter.com/CabCricket/status/1225058457142747136?s=19

कॅबच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अविषेक म्हणाला की, “कॅबचा अध्यक्ष बनणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी प्रत्येक सदस्याचे त्यांनी दिलेल्या समर्थनासाठी आभार मानतो.”

“मैदानाच्या बाहेरही क्रिकेट हा एकप्रकारे संघिक खेळ आहे. तसेच आम्ही एका संघाप्रमाणे काम करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आम्हाला कॅबचे सदस्य आणि माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडून समर्थन मिळण्याची पूर्ण खात्री आहे,” असेही अविषेक यावेळी म्हणाला.

“मी माझी तुलना कॅबच्या माजी अध्यक्षांशी करू शकत नाही. कारण, त्यांचे कार्य महान होते. मी माझ्या वडिलांच्या खोलीत बसलो असल्यामुळे हा माझ्यासाठी भावनात्मक क्षण आहे,” असे माजी अध्यक्षांबद्दल बोलताना अविषेक म्हणाला.

कॅबसाठीच्या आपल्या रणनीतीबद्दल बोलताना अविषेकने सांगितले की, तो ईडन गार्डन स्टेडियममधील सुविधांवर लक्ष देईल. तसेच या सुविधा पुढील महिन्यांपर्यंत सुरु करण्याचा प्रयत्न करेल.

https://twitter.com/Maha_Sports/status/1225063611149643776

https://twitter.com/Maha_Sports/status/1225052083998482432

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---