भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी20 मालिकेत ईशान किशन याला बाहेर बसावे लागले होते. सोबतच 14 महिन्यानंतर टी20 मध्ये खेळण्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना टी20 मध्ये स्थान देण्यात आले होते. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की, इतका धडाकेबाज फलंदाज याला संघात स्थान का नाही?
इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ घोषित करण्यात आला आहे यामध्ये भारताच्या यष्टीरक्षक आणि जबरदस्त फलंदाज असणाऱ्या ईशान किशन (Ishan Kishan) याची निवड केली नाही. याच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केएस भरत, ध्रुव जुरेल आणि केएल राहुल अशी 16 सदस्यीय संघाची यांची निवड केली आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतोय की, ईशानला सलग मालिकेतून बाहेर का बसावं लागलं आहे? पहिले अफगाणिस्तान टी20 मालिकेत स्थान दिले नाही आणि आता इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेमधूनही बाहेर केले आहे.
या अडचणीची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकामधून ईशानने नाव माघारी घेतल्यामुळे झाली. बीसीसीआयने (BCCI) सांगितले की, ईशानने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली होती, पण इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार ईशान किशन नाराज असल्याचे म्हणले जात आहे. तो संघासोबत प्रवास करत होता परंतू त्याला प्लेइंग 11मध्ये स्थान मिळात नव्हते. याचं कारणामुळे ईशानने मानसिक थकवा सांगून बीसीसीआयकडे सुट्टीची मागणी केली. बीसीसीआयने त्याची मागणी स्विकारत त्याला सुट्टी दिली होती.
यादरम्यान, सुट्टी घेऊन गेलेल्या ईशानची एक अजबच घटना समोर आली आहे तो चक्क दुबईमध्ये भारताच माजी कर्णधार एमएस धोनी सोबत पार्टी करत होता. याच बाबीवर निवडकर्ते नाराज झाले असावेत आणि त्यामुळेच ईशानला अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी संघात स्थान मिळाले नाही. जेव्हा याविषयी प्रशिक्षक राहुल द्रविड यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, ईशान आता उपलब्ध नाही. जेव्हा तो उपलब्ध राहील निश्चितचं संघात असणार आहे पण पहिल्यांदा त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळाव लागेल. म्हणजे राहुल द्रविड यांनी स्पष्ट सांगितले आहे की, देशांतर्गत क्रिकेट खेळून स्वत: ला सिद्ध केल्याशिवाय भारतीय संघात स्थान मिळवने कठीण आहे.
प्रशिक्षकाच्या सल्ल्याला नजरअंदाज करणं पडलं महागात
राहुल द्रविड(Rahul Dravid) यांनी चेतावनी देऊनही ईशान किशनने देशांतर्गत क्रिकेट खेळण्याला जास्त महत्त्वाचं नाही. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठा हंगाम रणजी ट्रॉफी यासाठीही ईशान उपलब्ध झाला नाही. त्याने झारखंड क्रिकेट असोसिएशनकडे रणजी खेळण्याबाबत कोणताही संपर्क केला नाही. आणि सध्या तो सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्याला याच कारणामुळे भारतीय कसोटी संघात स्थान दिले नसावे अशा चर्चा आहेत.
इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे त्यापैकी 2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. यातील पहिला कसोटी सामना 25 जानेवारीला हैदराबाद येथे सुरु होणार आहे. (Avoiding Dravid costs Ishan; The coach shows the direct exit, read on)
महत्त्वाच्या बातम्या
ध्रुव जुरेलची भारताच्या कसोटी संघात निवड, पाहा लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा कसा बनला क्रिकेटर
स्टीव्ह स्मिथला स्लेजिंग करून डेव्हिड वॉर्नरला मिळालं मोठं यश, पाहा कसा पाठवला पॅव्हेलियनमध्ये