---Advertisement---

वेट प्लेट्सवर बॅलन्स करत श्रेयस अय्यरचे अनोखे पुशअप्स, रणवीर सिंगही व्हिडिओ पाहून चकित

On: गुरूवार, ऑगस्ट 26, 2021 2:07 AM
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर त्याच्या संघापूर्वी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२१) च्या दुसऱ्या लेगसाठी यूएईला पोहोचला होता. तिथे पोहोचल्यानंतर त्याने मैदानावर सरावही सुरू केला. अय्यर प्रशिक्षक प्रवीण आमरे यांच्यासोबत सराव करत होता. मात्र, आता दिल्ली कॅपिटल्सचा संघही यूएईला पोहोचला आहे. यूएईला पोहोचलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा संघ सध्या क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहे. त्यामुळे खेळाडू त्यांच्या खोल्यांमधून प्रशिक्षण घेत आहे.

दरम्यान, श्रेयस अय्यरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो अनोख्या पद्धतीने पुशअप्स करताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगनेही त्याच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

या व्हिडिओमध्ये श्रेयस अय्यर वेट प्लेट्सवर बॅलन्स करून पुशअप्स करत आहे. हे पुशअप्स जितके कठीण वाटतात तितकेच ते करणे देखील अधिक कठीण आहे. वेट प्लेट्सला हातांनी संतुलित करून, तुमचे सर्व वजन त्यांच्यावर टाकणे हे खूप कठीण काम आहे. पण अय्यर हे अगदी आरामात करत असल्याचे दिसते. याआधी दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर झालेल्या सरावावेळी तो मोठे फटके मारताना दिसला होता. त्यामुळे तो पूर्णपणे तंदुरुस्त असून फॉर्ममध्ये असल्याचेही त्याने याद्वारे सांगितले होते.

https://www.instagram.com/p/CS9YSwNJ8ar/

खांद्याच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यामध्ये खेळला नाही. त्याच्या जागी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतला करण्यात आले होते. पंतच्या नेतृत्वाखाली संघाने पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केली आणि ८ सामन्यांत १२ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. यापूर्वी आयपीएल २०२० मध्ये, संघ अय्यरच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत पोहोचला होता. परंतु, त्यांना अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सच्या हातून पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Screengrab: Instagram/Shreyas Iyer

आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून खेळला जाईल. अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. दुसऱ्या टप्प्याचा पहिला सामना दुबईमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्स २२ सप्टेंबरला दुबईत सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आयपीएल १४ च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना खेळणार आहे. आता दुसऱ्या टप्प्यात अय्यर पुनरागमन करणार असल्याने दिल्लीचे कर्णधारपद अय्यरला परत दिले जाणार की पंतकडे कायम ठेवले जाणार, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

असे तीन खेळाडू जे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला मिळवून देऊ शकतात पहिली आयपीएल ट्रॉफी

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयने आसामच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूला दिली महत्त्वाची जबाबदारी

भारीच! १४४ वर्षाच्या क्रिकेट इतिहासात ‘असा’ कारनामा करणारा बटलर दुसराच यष्टिरक्षक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---