भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरुवात झाली आहे. हा सामना भारतीय संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गोलंदाजीची सुरुवात केली ती ईशांत शर्मा आणि मोहम्मद सिराजने. यानंतर गोलंदाजीला आलेल्या अक्षर पटेलने त्यच्या डावातील पहिल्याच षटकात इंग्लंडचा सलामीवीर डॉम सिब्लीला त्रिफळाचीत केले. यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तिसऱ्या सामन्यात ११ गडी बाद करणाऱ्या अक्षर पटेलने या सामन्यात देखील आपल्या फिरकीची जादू दाखवली आहे. अक्षरने षटकातील दुसऱ्याच चेंडूवर इंग्लंड संघाचा सलामी फलंदाज सिब्लीला घातक फिरकी चेंडू टाकला. हा चेंडू त्याच्या बॅटच्या आतल्या बाजूला लागत त्रिफळा उडवत निघून गेला.
सामन्याच्या ६ व्या षटकात कर्णधार विराट कोहलीने अक्षरला गोलंदाजीची जबाबदारी दिली होती. अशातच षटकातील अवघ्या दुसऱ्याच चेंडूवर त्याने सिब्लीला २ धावांवर माघारी पाठवले आहे.
https://twitter.com/cricketfanvideo/status/1367334719222808577?s=20
Axar Patel hits Dom Sibley's timber, 2nd ball of his spell #IndvsEng #INDvENG pic.twitter.com/fmw20lhb2r
— Ajay Kaul (@ajaykaul10) March 4, 2021
तसेच सामन्यात प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाला चांगली सुरुवात मिळाली नाही. सलामीचा फलंदाज जॅक क्रावली अवघ्या ९ धावा करत माघारी परतला. तर सिब्लीला २ धावा करता आल्या. तसेच इंग्लंड संघाचा कर्णधार या सामन्यात देखील अयशस्वी ठरला आहे. त्याला ५ धावांवर मोहम्मद सिराजने माघारी धाडले आहे. भारतीय संघाकडून गोलंदाजी करतांना अक्षर पटेलला २ गडी बाद करण्यात यश आले आहे, तर मोहम्मद सिराजने जो रूट हा महत्वाचा गडी बाद केला.
महत्त्वाच्या बातम्या-
चौथ्या कसोटीत कोहली आणि स्टोक्समध्ये शाब्दिक बाचाबाची, पाहा व्हिडिओ
पोलार्ड बनला ‘सिक्सर किंग’, एका षटकात मारले सलग ६ षटकार; व्हिडिओ पाहून आठवेल युवराज