आयपीएल 2024 च्या 20 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर रविवारी (7 एप्रिल) दुपारी झालेल्या या सामन्यात दिल्लीसमोर विजयासाठी 235 धावांचं लक्ष्य होतं. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीला निर्धारित 20 षटकांत आठ विकेट्स गमावून 205 धावाच करता आल्या.
मुंबई इंडियन्स नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आली होती. सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली. हे दोन्ही फलंदाज अत्यंत धोकादायक पद्धतीनं फलंदाजी करत होते. पण शेवटी अक्षर पटेलनं या दोघांवरही मात केली.
अक्षर पटेलनं आधी 8व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहितला क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर 11 व्या षटकात इशान किशनला स्वत:च्या गोलंदाजीत झेलबाद केलं. इशान ज्या पद्धतीनं बाद झाला, ते पाहून तो स्वत:ही हैराण झाला. त्याचा बाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. किशननं 23 चेंडूत 42 धावा करताना 4 चौकार आणि 2 षटकार ठोकले.
अक्षर पटेल मुंबई इंडियन्सच्या डावातील 11व्या षटकात गोलंदाजीसाठी आला होता. या षटकाच्या आधी अक्षर पटेलनं 3 षटकांत 27 धावा दिल्या होत्या. इशाननं षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून दमदार सुरुवात केली. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरही त्याला मोठा शॉट खेळायचा होता. त्यानं जोरात शॉट मारला, परंतु चेंडू सरळ गोलंदाजी करत असलेल्या अक्षर पटेलच्या हाती गेला. किशनचा फटका इतका वेगवान होता की कॅच पकडणं अशक्यच वाटत होतं, परंतु अक्षरनं अविश्वसनीय झेल घेत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं.
10.1: 🙌
10.2: ☝️Axar Patel wins the battle 🆚 Ishan Kishan with a brilliant caught and bowled 👌
Watch the match LIVE on @JioCinema and @starsportsindia 💻📱#TATAIPL | #MIvDC pic.twitter.com/bPUYRfPf86
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2024
मुंबई इंडियन्सनं या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव केला. चालू हंगामातील मुंबई इंडियन्सचा हा पहिलाच विजय आहे. या आधी मुंबई इंडियन्सनं सलग तीन सामने गमावले होते. तर दिल्ली कॅपिटल्सचा पाच सामन्यांमधला हा चौथा पराभव ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-