---Advertisement---

शेवटच्या षटकावेळी डोक्यात काय चालू होते? मॅच विनर अक्षर पटेलने केला महत्त्वपूर्ण खुलासा

On: सोमवार, जुलै 25, 2022 8:38 PM
Axar-Patel-1
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाला वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा वनडे सामना जिंकवत मालिकाही जिंकवण्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या सामनावीर अक्षर पटेल याची युझवेंद्र चहल याने खास मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान दोघांमध्ये मजेशीर संभाषण झाले. बीसीसीआयने त्यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. भारतीय संघाने रविवारी (२४ जुलै) त्रिनिदाद येथे झालेला दुसरा वनडे सामना २ विकेट्सने जिंकला. या विजयासह भारतीय संघ ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० वे आघाडीवर आहे. 

दुसऱ्या वनडे सामन्यानंतर चहलने चहल टीव्हीवर अक्षरची मुलाखत घेतली. चहलने नेहमीप्रमाणे आपल्या मुलाखतीदरम्यान मजा-मस्तीही केली. चहल म्हणाला की, “अक्षर फलंदाजी करताना खूप घाबरलेला होता. टेंशनमध्ये त्याने त्याच्या हाताची सर्व नखे खाल्ली होती. तो इतका जास्त घाबरलेला होता, जितका मी माझ्या लग्नाच्या दिवशीही घाबरलेला नव्हतो.”

पुढे चहलने अक्षरला अंतिम षटकात फलंदाजी करताना त्याच्या डोक्यात काय चालू होते?, असा प्रश्न विचारला. याचे उत्तर देताना अक्षर म्हणाला की, “मी जेव्हा खेळपट्टीवर गेलो होतो, तेव्हा भारतीय संघाला ११ षटकात कदाचित १०५ धावांची गरज होती. मी आणि दिपक हुड्डा बोलत होतो की, या धावा जास्त नाहीत. कारण आयपीएलदरम्यान बऱ्याचदा आम्ही अशा स्थितींचा सामना केला होता, ज्यामध्ये शेवटच्या काही षटकांमध्ये जास्त धावांचा पाठलाग करायचा असायचा. मग आम्ही फक्त आपल्या शैलीत फलंदाजी करायचे ठरवले. आम्ही परिस्थितीचा जास्त विचार न करता खेळलो.”

तसेच पुढे बोलताना अक्षरने खुलासा केला की, “त्याला सामन्याचा विजयी शेवट करण्याची योजना आवेश खानकडून मिळाली. अक्षर म्हणाला की, ४९व्या षटकात आम्ही सामना संपवण्याचे ठरवले होते. आवेशने मला सांगितले होते की, वेस्ट इंडिजच्या ३ महत्त्वपूर्ण गोलंदाजांची १० षटके फेकून झाली आहेत. त्यामुळे आता कोणताही कामचलाऊ गोलंदाज गोलंदाजी करेल, याचा आम्हाला अंदाज होता. मला आवेशचा हा सल्ला आवडला. तरीही मी ४९व्या षटकात कसलीही जोखीम न घेण्याचे ठरवले.”

अंतिम षटक कायले मेयर्सने टाकले. आम्ही पहिल्या ३ चेंडूंमध्ये तीनच धावा करू शकलो. शेवटी ३ चेंडूत ५ धावांची गरज असताना अक्षरने षटकार मारत संघाला सामना जिंकून दिला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘गाबा’चा बदला घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ सज्ज, असे असेल वेळापत्रक

पहिल्या वनडेत सुसाट असलेल्या धवनच्या गाडीला दुसऱ्या सामन्यात लागला ब्रेक, रंगली एकच चर्चा

कॅप्टनसीचा फायदा घेत धवन ‘या’ सलामीवीराची कारकीर्द लावतोय पणाला? वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---