भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने 263 धावा उभ्या केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय संघ 262 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारतीय संघाला इथपर्यंत मजल मारून देण्यात अष्टपैलू अक्षर पटेल याची मोठी भूमिका राहिली. त्याच्या दमदार अर्धशतकाने भारत या सामन्यात पुनरागमन करू शकला. त्याचवेळी आता अक्षरने आपल्या यशाचे श्रेय ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याला दिले आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात उभारलेल्या 263 धावांचा पाठलाग करताना भारताचे प्रमुख फलंदाज लवकर बाद झाले होते. भारताने 139 वर आपले सात गडी गमावले असताना अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन यांनी धीराने भारताचा डाव पुढे नेला. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा मोठी आघाडी घेण्याचा मनसुबा उधळून लावला. दोघांनी शतकी भागीदारी केली. अक्षरने आक्रमण करताना 115 चेंडूत 9 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 74 धावा फटकावल्या.
अक्षर या मालिकेत फलंदाजीत उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसून आला आहे. त्याने पहिल्या सामन्यातही नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना 84 धावांची लाजवाब खेळी केली होती. तसेच गोलंदाजीतही त्याला चार बळी मिळवण्यात यश आलेले.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर तो पत्रकारांना सामोरा गेला. त्यावेळी बोलताना त्याने आपल्या या यशाचे श्रेय ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याला दिले. तो म्हणाला,
“माझ्या फलंदाजी झालेला बदल हा बऱ्यापैकी रिकीमूळे झाला. त्याच्यामुळे मी खरंतर चांगला माईंड सेट ठेवून खेळू लागलो. भारतीय संघातील प्रमुख फलंदाजांशी देखील सातत्याने बोलण्याचा मला फायदा झाला.”
अक्षर हा मागील तीन वर्षापासून आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. रिकी पॉंटिंग या संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.
(Axar Patel Gives His Success Credit To Ricky Ponting)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इमर्जन्सीमध्ये संघात आला आणि विराटची ‘ड्रीम विकेट’ घेऊन गेला, कुह्नेमनचे दमदार पदार्पण
जबरदस्त! जिमी अन् ब्रॉडचा जागतिक क्रिकेटमध्ये राडा, मोडला वॉर्न-मॅकग्रा जोडीचा ‘तो’ World Record