भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्यात अपयश आले. श्रीलंका संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ करत भारतीय संघाला 16 धावांनी पराभूत केले. भारतीय संघाला या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी, अष्टपैलू अक्षर पटेल याने आपल्या फलंदाजीने सर्वांची मन जिंकले.
श्रीलंकेने या सामन्यात आक्रमक फलंदाजी करत भारतीय संघासमोर 207 धावांचे आव्हान ठेवले होते. भलेमोठे आव्हान घेऊन उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. भारताने कर्णधार हार्दिक पंड्यासह आपले 5 बळी केवळ 57 धावांमध्ये गमावले. मात्र, त्यानंतर सूर्यकुमार यादव व अक्षर पटेल यांनी अक्षरशा श्रीलंकन गोलंदाजांची पिसे काढली. दोघांनी अवघ्या 6 षटकात 91 धावांची भागीदारी केली. अक्षरने 20 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.
भारतीय संघ सामन्यातून बाहेर झाला आहे असे वाटत असताना त्याने वनिंदू हसरंगाला सलग तीन षटकार ठोकत सामना रंगतदार बनवला. अखेरच्या षटकापर्यंत तो मैदानावर उभा होता. बाद होण्यापूर्वी त्याने 31 चेंडूवर 65 धावा कुटल्या. यात 3 चौकार व 6 उत्तुंग षटकारांचा समावेश होता.
या खेळी दरम्यान त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत अर्धशतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी, रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 44 धावांची नाबाद खेळी केलेली. तर, मागील वर्षी दिनेश कार्तिक याने वेस्ट इंडीजविरुद्ध नाबाद 41 धावा केलेल्या. तसेच, सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येथे सर्वाधिक 6 षटकारही त्यानेच ठोकण्याची कामगिरी करून दाखवली. यापूर्वी कार्तिकने चार षटकार मारलेले.
(Axar Patel Scored Highest T20I Score By Indian Batter At No 7 And Below)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
थरारक सामन्यात भारत पराभूत, श्रीलंकेची विजयासह मालिकेत बरोबरी, अक्षरने जिंकली पुणेकरांची मने!
नो बॉलने कापले नाक! श्रीलंकेविरुद्ध भारतीय गोलंदाजांच्या नावे लाजिरवाणा विक्रम