भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी20 विश्वचषकातील 51 वा सामना सेंट लुसिया येथे खेळला गेला. दोन्ही संघांचा सुपर-8 मधला हा शेवटचा सामना होता आणि तो खूप रोमांचकही होता. प्रथम फलंदाजी करताना, भारताने संपूर्ण षटक खेळले आणि 205/5 धावांची मोठी धावसंख्या बोर्डवर ठेवली. या सामन्यात भारतीय खेळाडूंचा शानदार क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळाला. अक्षर पटेल, रोहित शर्मा सुर्यकुमार यादव यांनी सामन्यात शानदार झेल घेतले. पण अक्षर पटेलचा अप्रतिम झेल चर्चेचा विषय ठरला.त्याने एका हाताने सीमारेषेजवळ असा आश्चर्यकारक झेल घेतला की, फलंदाजही थक्क झाले. त्याच्या या कॅचमुळे त्याला बेस्ट फिल्डरचा मेडल देण्यात आले आहे.
Team India’s throwdown specialist presented Axar Patel the best fielder medal. ????️
– Catch of the tournament from Axar. pic.twitter.com/evTFggy6gB
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 25, 2024
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीदरम्यान रोहित शर्माने डावातील 9वे षटक कुलदीप यादवकडे सोपवले. या षटकातील शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या अक्षर पटेलने एका दमात अप्रतिम झेल घेत सर्वांनाच चकित केले. एकदा मार्शला तो बाद झाला यावर विश्वासच बसत नव्हता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मार्श 28 चेंडूत 37 धावा करून बाद झाला. कुलदीप यादवने भारताला मोठे यश मिळवून दिले.
AXAR PATEL – YOU BEAUTY…!!! ????pic.twitter.com/XtOPbtrKqj
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 24, 2024
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 5 विकेट गमावून 205 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला 20 षटकांत 7 बाद 181 धावाच करता आल्या. सामनावीर रोहित शर्माने झंझावती खेळी केली. हिटमॅनने 41 चेंडूत 92 धावांची निर्णायक खेळी खेळली.
महत्तवाच्या बातम्या-
रोहितचा हिटमॅन अंदाज, ऑस्ट्रेलिया गोत्यात! टीम इंडिया इंग्लंड सोबत करणार हिशोब चुकता?
भारतानं केलं ऑस्ट्रेलियाचं अवघड, 24 धावांनी मात देत सेमी फायनलमध्ये थाटात एंट्री!
ब्रेकिंग न्यूज! बीसीसीआयकडून आगामी झिम्बाब्वे दाैर्यासाठी भारतीय संघाची घोषणा!





