क्रिकेट हा असा खेळ आहे, जिथे गोलंदाज पहिल्याच चेंडूपासून फलंदाजाला बाद करण्याच्या प्रयत्नात असतो. तर फलंदाज बचाव करत चौकार आणि षटकार मारून धावफलक हलते ठेवण्याच्या प्रयत्नात असतो. अशातच अनेकदा फलंदाजाला बाद होण्यासाठी गोलंदाजाची आवश्यकता भासत नाही. ते हिट विकेट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतत असतात. असाच काहीसा प्रकार एका टी-२० सामन्यादरम्यान घडला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मंगळवारी (२८ सप्टेंबर) सीएसए प्रांतीय टी -२० चषक स्पर्धेतील पुल बीच्या सामन्यात फलंदाज आगळ्या वेगळ्या प्रकारे बाद झाला होता. क्रिकेटमध्ये फलंदाजाला हिट विकेट होतानाचे प्रसंग बऱ्याचदा घडत असतात. फलंदाज जेव्हा क्रिजच्या खूप आतमध्ये येऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी बॅट किंवा पाय यष्टीला लागून फलंदाज अशाप्रकारे बाद होत असतो. परंतु या स्पर्धेत फलंदाज ज्याप्रकारे बाद झाला आहे. ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
तर झाले असे की, टायटन्स संघातील खेळाडू अयाबुलेला गकामाने फलंदाजी करत होता. त्यावेळी १९ वे षटक टाकण्यासाठी मिगेल प्रिटोरियस गोलंदाजीला आला होता. त्यावेळी त्याने वाईड यॉर्कर चेंडू टाकला. ज्यावर फलंदाजाने क्रिजच्या आत घुसून कव्हरच्या वरून शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न फसला आणि शॉट खेळण्यापूर्वीच त्याची बॅट ऑफ स्टंपला जाऊन धडकली. तो आगळ्या वेगळ्या प्रकारे बाद झाल्याने गोलंदाजालाही विश्वास होत नव्हता.
💬 "He's invented a new way to get out"
😱 Is this the most bizarre way to ever be dismissed?#T20KO #BePartOfIt pic.twitter.com/jRAJgv88s1— Proteas Men (@ProteasMenCSA) September 28, 2021
फलंदाज अशाप्रकारे बाद होण्याची ही पहिलीच वेळ असेल. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यावर त्यांनी कॅप्शन म्हणून, “गकमानेने बाद होण्याच्या नवीन पद्धतीचा अविष्कार केला आहे. ही बाद होण्याची सर्वात विचित्र पद्धत आहे का? “असे लिहिले आहे. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला पुन्हा मिळणार परदेशी प्रशिक्षक, अनिल कुंबळे शर्यतीतून बाहेर!
लाईव्ह सामन्यातील ‘त्या’ विवादावरुन कार्तिकने उठवला पडदा, सांगितले का अश्विनवर भडकला मॉर्गन?
पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी संजनाने केली होती भविष्यवाणी, बुमराह घेईल ‘इतक्या’ विकेट्स अन्…