लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल २०२२मधील आपला पहिला सामना सोमवारी (२८ मार्च) गुजरात टायटन्सविरुद्ध खेळला. या सामन्यात त्यांना गुजरात संघाकडून ५ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, आयपीएलच्या १५व्या हंगामात पदार्पण करणाऱ्या लखनऊच्या २२ वर्षीय आयुष बदोनीने आपल्या विस्फोटक फलंदाजीने धुमाकूळ घातला. त्याने ४१ चेंडूत ५४ धावा ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. या धावा करताना त्याने ३ षटकार आणि ४ चौकारही ठोकले. या अर्धशतकासह त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.
आयुष बदोनी (Ayush Badoni) आयपीएलमध्ये पदार्पण करत सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना ५०हून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे, त्याने १५वे षटक टाकण्यास आलेल्या गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या पहिल्या ३ चेंडूंवर अनुक्रमे षटकार आणि २ चौकार ठोकले. त्याची ही कामगिरी नक्कीच उल्लेखनीय आहे. मात्र, आयपीएल पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात विस्फोटक खेळी करणारा आयुष बदोनी नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आज आपण या लेखातून तेच जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया…
ICYMI: An IPL debut to remember! 👏 👏
Ayush Badoni was impressive with the bat & scored a fine half-century. 👍 👍 #TATAIPL | #GTvLSG | @LucknowIPL
Relive his knock 🎥 🔽https://t.co/Q0HBUpEyRj pic.twitter.com/55BuR4Jrba
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2022
कोण आहे आयुष बदोनी?
गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujarat Titans) शानदार अर्धशतक ठोकणारा फलंदाज आयुष बदोनी हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाकडून खेळतो. तो एक अष्टपैलू खेळाडू असून खालच्या फळीत उपयुक्त खेळी करण्याच पटाईत आहे. त्याने भारतीय संघाच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळताना श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात १८५ धावांची खेळी करत वाहवा लुटली होती. त्याने ४ दिवसीय सामन्यात ९.३ षटके गोलंदाजी करताना २४ धावा देत ४ विकेट्सही चटकावल्या होत्या. यादरम्यान त्याने २ निर्धाव षटके टाकल्या होत्या.
बदोनीने २०१८ साली १९ वर्षांखालील आशिया चषकात शानदार कामगिरी केली होती. त्याने श्रीलंकेविरुद्ध खेळताना २८ चेंडूत ५२ धावांची खेळी केली होती. यानंतर जानेवारी २०२१मध्ये त्याने आपले टी२० पदार्पण केले होते. तसेच, आयुष देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाकडून ५ सामनेही खेळला आहे.
लखनऊ संघाने २० लाखात ताफ्यात केले सामील
आयपीएल २०२२चा मेगा लिलाव खूपच महत्त्वाचा होता. कारण, या हंगामात ८ नाही, तर १० संघ खेळणार होते. अशात प्रत्येक संघाने या लिलावात सर्वाधिक बोली लावत चांगले-चांगले खेळाडू आपल्या संघात घेतले. त्यात लखनऊ संघानेही देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या बदोनीला २० लाखांच्या मूळ किंमतीत विकत घेतले होते. अशात बदोनीने पहिल्याच सामन्यात शानदार अर्धशतक ठोकत हे स्पष्ट केले आहे की, त्याला पुढच्या लिलावात २० लाखांपेक्षा नक्कीच जास्त रुपये मिळतील.
महत्त्वाच्या बातम्या-
नुसता कॅच नव्हे, शुबमन गिलने मॅच हातात घेतली? जबरदस्त ‘हवाई झेल’चा व्हिडिओ होतोय व्हायरल
व्हॉट अ स्टार्ट! शमीने सर्वांच्याच उंचावल्या भुवया, पहिल्याच चेंडूवर लखनऊचा कर्णधार ‘गोल्डन डक’
आयपीएलमध्ये इतक्या फ्रँचायझी, त्यांचे इतके बॉलर… पण शमीने गुजरातसाठी जे केले ते ऐतिहासिकच