---Advertisement---

ज्या 25 वर्षाच्या कॅप्टन अंडर विराट खेळला शेवटचा सामना, पहा त्याची पोस्ट

On: सोमवार, मे 12, 2025 4:09 PM
---Advertisement---

भारताचा दिग्गज क्रिकेटर तसेच भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार विराट कोहलीने सोमवारी (12 मे) कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. (Virat Kohli Retired From Test Cricket) विराटने 36व्या वर्षी कसोटीतून निवृत्ती घेतल्याने क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. अनेक युवा खेळाडू, क्रिकेट तज्ञ, माजी दिग्गज क्रिकेटर विराटच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया देत आहेत. अशातच ज्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली विराटने आपला शेवटचा कसोटी सामना खेळला त्याने विराटबद्दल खास पोस्ट शेअर केली आहे.

25 वर्षाच्या आयुष बदोनीच्या नेतृत्वाखाली विराटने आपला शेवटचा लाल चेंडूचा सामना खेळला. हा रणजी क्रिकेटमधील सामना होता. जो दिल्लीच्या मैदानावर खेळला गेला आणि या संघाचा कर्णधार आयुष बदोनी होता. आता विराटच्या निवृत्तीनंतर आयुष बदोनीने इंस्टाग्रामवर एक स्टोरि शेअर केली आहे. त्यामध्ये विराट कोहली आणि तो दिसत आहे. या स्टोरिमध्ये त्याने लिहलं की, “मला माहित नव्हतं की हाच तुमचा शेवटचा लाल चेंडूवरील सामना असेल.”

विराट कोहलीच्या कसोटी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास त्याने भारतासाठी 2011 मध्ये कसोटी पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत त्याने भारतासाठी 123 कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान विराटने 210 डावात 46.85च्या सरासरीने फलंदाजी करताना 9,230 धावा केल्या आहेत. कसोटीतील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 254 राहिली आहे. कसोटीमध्ये त्याने 31 अर्धशतकांसह 30 शतके आणि 7 द्विशतके झळकावली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---