भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या आयुष्यावर आधारीत सिनेमा आपल्या भेटिला येणार आहे. गांगुलीच्या बायोपिकच्या बातम्या तशा पाहिल्या तर मागच्या तीन-चार वर्षांपासून समोर येत आहेत. याआधीही अनेकादा गांगुलीच्या बायोपिकसाठी वेगवेगळ्या अभिनेत्यांची नावे चर्चेत आली आहेत. असे असले तरी, यावेळी त्याच्या बायोपिकविषयी पक्की बातमी समोर येत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार अयुष्मान खुराना माजी बीसीसीआय अध्यक्षांच्या बायोपिकमध्ये मुख्य पात्र साकारू शकतो.
सौरव गांगुली (Gourav Ganguly) भारतीय संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक राहिला आहे. भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणूनही त्यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली. मागच्या वर्षी गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्या बायोपिकच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या होत्या. पण त्याविषयी कुठलीच ठोस माहिती समोर आली नाही. रणबीर कपूर याने वा गांगुलीच्या बायोपिकसाठी चर्चेत होते. रणबीरने गांगुलीचे पात्र साकारण्यासाठी क्रिकेटचा सराव सुरू केल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. पण नंतर या सर्व बातम्या चुकीच्या असल्याचे समोर आले.
पण पीपींग मूनच्या माहितीनुसार ‘उडान’ आणि ‘लुटेरा’ असे सिनेमे बनवणारे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी गांगुलींच्या बायोपिकचे दिग्दर्शन करणार आहेत. रिपोर्टमधील कोटमध्ये सूत्राच्या हवाल्याने सांगितले गेले आहे की, “निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग आपल्या लव फिल्म्स या बॅनरखाली हा सिनेमा बनवणार आहेत. गांगुलींप्रमाणे आयुष्मान देखील डावखुरा फलंदाज आहे आणि त्याच्या बायोपिकमध्ये फिट बसतो. लवकरच या सिनेमाची अधिकृत घोषणा केली जाईल.”
माध्यमांतील वृत्तांनुसार आयुष्मान खुराना आधीपासूनच या सिनेमासाठी पहिली पसंती असणारा अभिनेता होता. निर्माते मागच्या मोठ्या काळापासून त्याच्याशी चर्चा करत होते. माहितीनुसार आता अयुष्मानने या सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला असून करारावर स्वाक्षरी देखील केली आहे. असे सांगितले गेले आहे की, आयुष्मान पुढचे काही महिने क्रिकेट खेळण्याचा सराव करणार आहे. 2024च्या उत्तरार्धात सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
असेही सांगितले जाते की, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी यांनी या सिनेमावर काम करण्यास सुरुवातीला नकार दिला होता. त्यानंतर निर्मात्यांनी इतर काही दिग्दर्शकांशीही चर्चा केली. पण अखेर दिग्दर्शक म्हणून निर्मात्यांना मेजवानीचीच साथ मिळाली. 2025 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होण्याचा अंदाज व्यक्त केले जात आहे. (Ayushmann Khurrana will play the lead role in Sourav Ganguly’s biopic)
महत्वाच्या बातम्या –
पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत जिज्ञासा, सानिका उपांत्य फेरीत
67व्या शालेय राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत सांघिक गटात महाराष्ट्र संघाचा अंतिम फेरीत प्रवेश