---Advertisement---

Video: मोहम्मद अझरुद्दीन मुलाचा षटकार पाहून खूश! फ्रेंडशीप कपमध्ये बाप-लेकाच्या जोडीचा धुमाकूळ

On: सोमवार, मार्च 7, 2022 1:42 PM
Mohammad-Azharuddin-son
---Advertisement---

युएईमध्ये सध्या सुरु असलेल्या फ्रेंडशिप कप २०२२ मध्ये भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि त्याचा मुलगा असदुद्दीन या जोडीची फलंदाजी पाहायला मिळाली. बाप-लेकाच्या या जोडीने या स्पर्धेत शानदार फलंदाजी करत ६२ धावांची भागीदारी केली आणि इंडिया लीजेंड्स आणि बॉलीवुड किंग्स यांच्या तिसऱ्या सामन्यात इंडिया लिजेंड्स कडून खेळताना संघाला २ धावांनी विजय मिळवून दिला.

या सामन्यादरम्यान कर्णधार अजहरुद्दीनचा मुलगा असदुद्दीनने षटकार लगावला, तो षटकार पाहून त्याचे वडील सुद्धा त्याचे चाहते झाले. त्याच्या शाॅटचा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

इंडिया लिजेंडस संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाने १० षटकात २ विकेट गमावत ८३ धावा केल्या. इम्तियाज अहमद बाद झाल्यानंतर अझरुद्दीन आणि असदुद्दीन या जोडीने ६२ धावांची भागीदारी केली. अझरुद्दीनने ३१ धावा, तर असदुद्दीनने २२ धावा केल्या. इंडिया लिजेंड्सने बॉलीवुड किंग्स संघासमोर ८४ धावांचे लक्ष ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना बाॅलीवुड संघाने १० षटकात ६ विकेट गमावत ८१ धावा केल्या आणि हा सामना २ धावांनी गमवला.

https://www.instagram.com/p/Caxf9-_j93B/

५ मार्चला फ्रेंडशिप कप २०२२ ही स्पर्धा सुरु झाली असून ७ मार्चला या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. वर्ल्ड लीजेंड्सविरुद्धचा पहिला सामना भारतीय लिजेंडस संघाने ७३ धावांनी गमावला होता. या स्पर्धेत ४ संघांनी सहभाग नोंदवला आहे, यामध्ये इंडिया लिजेंड्स, पाकिस्तानी लिजेंड्स, वर्ल्ड ११ लिजेंड्स आणि बाॅलिवूड किंग्स या संघांचा समावेश आहे.

भारत लीजेंड्स
मोहम्मद अझरुद्दीन, अजय जडेजा, व्यंकटेश प्रसाद, नयन मोंगिया, विनोद कांबळी, डब्ल्यूवी रमन, अजय शर्मा, राजेश चौहान, निखिल चोपडा, संजय बांगर, संजय मांजरेकर, रॉबिन सिंग, मुनाफ पटेल, मोहम्मद कफ, इरफान पठान

पाकिस्तान लीजेंड्स
इमरान नजीर, सलमान बट, मोहम्मद यूसुफ, यासिर हमीद, राणा नविद, मोहम्मद इरफान, रजा हसन, तौफीक उमर, राहत अली, जुल्फिकार बाबर, अब्दुर रहमान

वर्ल्ड ११ लीजेंड्स
अब्दुर रज्जाक, शहरियार नफीस, डॉलर महमूद, जुपिटर घोष, अजंता मेंडिस, नुवान कुलसेकरा, चमारा कपुगेदरा, जॉन सिम्पसन, समीउल्लाह शेनवारी, फरीद अहमद मलिक, अशरफ शराफुद्दीन, ग्रीम क्रेमर, ब्रेंडन टेलर, एल्टन चिगुंबुरा

बॉलीवुड किंग्स
सुनील शेट्टी, सोहेल खान, आफताब शिवदासानी, रितेश देशमुख, बॉबी देओल, शब्बीर अहलूवालिया, साकिब सलीम, कुणाल खेमू, शरद केळकर, वत्सल सेठ, अपूर्व लाखिया, वरुण बडोला, समीर कोचर, इंद्रनील सेनगुप्ता, कबीर सदानंद, तुषार झेरलोटा , साहिल चौधरी

महत्त्वाच्या बातम्या

ताक धिना धिन धा! श्रीलंकेच्या कर्णधाराला बाद करणाऱ्या शमीच्या डोक्यावर अश्विनने वाजवला तबला- Video

‘तो सर्व सोन्यात बदलतोय’, मास्टर-ब्लास्टरनेही घेतली जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीची दखल

कर्णधार रोहित शर्माने खांद्यावर घेतली मोठी जबाबदारी! म्हणाला, ‘विजयापेक्षा संघात बेंच स्ट्रेंथ…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---