---Advertisement---

संघसहकाऱ्याची गोलंदाजी पाहून बाबर आझमही झाला घायाळ; प्रशंसा करत म्हणाला, ‘हाय हाय मजे’

On: मंगळवार, ऑगस्ट 24, 2021 6:34 PM
---Advertisement---

क्रिकेट हा खेळ खूप रोमांचक मानला जातो. बऱ्याचदा खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी संघातील सदस्य वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. ज्यामुळे खेळाडूं प्रोत्साहित राहतो आणि संघास त्यास फायदाही होतो. असेच काहीसे घडले आहे, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या कसोटी सामन्यात.

वेस्टइंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना जमैकाच्या सबिना पार्क येथे सुरू आहे. सामन्यात पाकिस्तानने आपल्या गोलंदाजांच्या बळावर मजबूत स्थितीत पोहचला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी शाहीन शाह आफ्रिदीच्या भेदक माऱ्यामुळे पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या 150 धावांत गुंडाळला.

शाहीनने शानदार गोलंदाजी करताना 51 धावा देत 6 बळी घेतले. पाकचा कर्णधार बाबर आझमही त्याच्या गोलंदाजांवर खूप खूश होता. बाबरचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, जिथे त्याने क्षेत्ररक्षण करताना मजेदार पद्धतीने शाहीनचे कौतुक केले आहे.

हा किस्सा घडला आहे वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावाच्या 42 व्या षटकात. त्यावेळी क्रीजवर जोशुआ डी सिल्वा आणि नॉन स्ट्रायकरच्या शेवटी जेसन होल्डर होते. जोशुआने शाहीनचा चेंडू सरळ बॅटने खेळला जो थेट बाबर आझमच्या हातात गेला. इथे बाबर ‘हाय हाय मजे’ असे म्हणताना दिसतो. बाबरची त्याच्या गोलंदाजांचे कौतुक करण्याची ही शैली चाहत्यांना खूप आवडत आहे.

https://twitter.com/Aadii_1728/status/1429863136258056197

सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर वेस्ट इंडिजविरुद्ध पाकिस्तानचा आतापर्यंत तरी वरचष्मा राहिला आहे. पहिल्या डावात 152 धावांच्या मोठ्या फरकाने आघाडी घेतल्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या डावात सहा गडी गमावत 176 वर डाव घोषित केला आणि वेस्ट इंडिजला सामना जिंकण्यासाठी 329 धावांचे लक्ष्य ठेवले. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाने एक गडी गमावून 49 धावा केल्या.

यजमानांना हा सामना आणि मालिका जिंकण्यासाठी शेवटच्या दिवशी 280 धावा करायच्या आहेत, तर त्यांच्याकडे 9 विकेट शिल्लक आहेत. संघाची एकमेव विकेट किरन पॉवेलच्या रूपात पडली, जो 23 धावा करून धावबाद झाला. शाहीन शाह आफ्रिदीने पहिल्या डावात सहा गडी बाद करत पाकिस्तानकडून मोलाचे योगदान दिले.

महत्त्वाच्या बातम्या – 

“हार्दिक पंड्या शरीराने खूपच बारीक आहे, त्यामुळे तो नेहमी दुखापतग्रस्त होतो”

अर्जुन तेंडुलकरचा मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न, दिग्गजांकडून गिरवतोय धडे, पाहा फोटो

‘या’ बाबतीत संगकारा आहे धोनीपेक्षा सरस, आजच्या दिवशी केलेला क्रिकेटला अलविदा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---