---Advertisement---

Babar Azam : टी-20 क्रिकेटमध्ये बाबर आझमने रचला इतिहास, मोडला क्रिस गेलचा वर्ल्ड रिकॉर्ड

On: गुरूवार, फेब्रुवारी 22, 2024 3:35 PM
Babar-Azam
---Advertisement---

सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम खेळत आहे. तसेच बाबर आझमने या लीगदरम्यान टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला असून एक मोठा विक्रम देखील त्याने त्याच्या नावावर केला आहे. बाबर आझमने वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलला मागे टाकून T20 फॉरमॅटमध्ये सर्वात जलद 10,000 धावा करणारा फलंदाज ठरला आहे. 

याबरोबरच, बाबर आझमने 271 डावात हा टप्पा गाठला आहे. तर ख्रिस गेलला ही कामगिरी करण्यासाठी 285 डाव लागले होते. तसेच भारताचा विराट कोहली या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने हे स्थान मिळवण्यासाठी 299 डाव लागले होते. सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर झल्मीकडून खेळणाऱ्या बाबरला विश्वविक्रम करण्यासाठी केवळ सहा धावांची गरज असताना कराची किंग्जविरुद्धच्या पीएसएल सामन्यात त्याने ही विक्रमी  कामगिरी केली आहे.

घ्या जाणून टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वात जलद 10,000 धावा करणारे फलंदाज :-

  1. बाबर आझम (पाकिस्तान)- 271 डाव
  2. क्रिस गेल (वेस्टइंडिज) – 285 डाव
  3. विराट कोहली (भारत)- 299 डाव
  4. डेव्हिड वॉर्नर (ऑस्टेलिया)-303 डाव
  5. एरॉन फिंच (ऑस्टेलिया)- 327 डाव

अशातच पाकिस्तानच्या माजी कर्णधारने सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 10,000 धावा करणारा 13 वा खेळाडू ठरला आहे. यामध्ये ख्रिस गेल 14,562 धावांसह पहिल्या स्थानावर आहे, तर पाकिस्तानचा शोएब मलिक 13,159 धावांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.

घ्या जाणून T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज :-

1.ख्रिस गेल (वेस्ट इंडिज)- 14562 धावा

2. शोएब मलिक (पाकिस्तान) – 13159 धावा

3. किरॉन पोलार्ड (वेस्ट इंडिज) – 12689 धावा

4. ॲलेक्स हेल्स (इंग्लंड) – 12209 धावा

5. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) – 12033 धावा

6. विराट कोहली (भारत) – 11994 धावा

दरम्यान, कराची किंग्जविरुद्धच्या सामन्यात बाबरने 6 धावा करताच टी-20 क्रिकेटमध्ये 10000 धावा पूर्ण करण्यात यश मिळवले आहे. तसेच बाबरने कराची किंग्ज विरुद्धच्या सामन्यात 72 धावांची दमदार खेळी केली आहे. तसेच बाबरने 51 चेंडूंचा सामना केला ज्यामध्ये त्याने 7 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---