पाकिस्तान क्रिकेट संघाचे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये नेतृत्व करणारा बाबर आझम (Babar Azam) याने मागच्या वर्षी केलेल्या कामगिरीसाठी त्याला सन्मानित केले गेले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने गुरुवारी (26 जानेवारी) वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू (पुरुष) म्हणून निवडले. ही घोषणा करण्याच्या काही वेळ आधीच आयसीसीकडून बाबरला वर्षातील सर्वोत्कृष्ट वनडे क्रिकेटपटू (ICC Men’s ODI Cricketer of the Year) म्हणून निवडले गेले होते.
Double delight for Babar Azam 🤩
After being named the ICC Men's ODI Cricketer of the Year, the Pakistan star bags the Sir Garfield Sobers Trophy for the ICC Men's Cricketer of the Year 👏#ICCAwards
— ICC (@ICC) January 26, 2023
बाबर आझमचे मागच्या वर्षभरातील कसोटी आणि टी-20 फॉरमॅटमधील प्रदर्शन वनडे प्रदर्शनाच्या तुलनेत सुमार दिसले. वनडे क्रिकेटमध्ये मात्र, त्याने फलंदाज आणि कर्णधार म्हणून नेत्रदीपक कामगिरी केली. यासाठी आयसीसीकडून बक्षीस म्हणून बाबरला वनडे प्लेअर ऑफ द इयर (ICC Men’s ODI Cricketer of the Year ) म्हणून निवडण्यात आले. पण पुढच्या काहीच तासांमध्येच आयसीसीने पुरुष प्लेअर ऑफ द इयर (ICC Men’s ODI Cricketer of the Year) पुरुस्काराची घोषणा केली. यात बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या दोघांना मात देत बाबरने बाजी मारली. तत्पूर्वी सूर्यकुमारला आयसीसी टी-20 प्लेअर ऑफ द इयर (ICC Men’s T20 Cricketer of the Year), तर बेन स्टोक्सला आयसीसी टेस्ट प्लेअर ऑफ द इयर (ICC Men’s Test Cricketer of the Year) म्हणून निवडले गेल आहे.
Domination 👊
For the second year in a row, the Pakistan star has taken home the ICC Men's ODI Cricketer of the Year Award 👏#ICCAwards
— ICC (@ICC) January 26, 2023
दरम्यान, वनडे क्रिकेटमधील मागच्या वर्षभरातील बाबरचे प्रदर्शन पाहिले तर ते अप्रतिम आहे. वनडे फॉरमॅटमध्ये त्याने मागच्या वर्षी इतर खेळाडूंच्या तुलनेत पाकिस्तानसाठी सर्वात जास्त 679 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 84.87 होती, तर स्ट्राईक रेट 90.77 चा होता. बाबरने 2022 मध्ये एकूण फक्त 9 वनडे सामने खेळले आहेत आणि यापैकी ८ सामन्यांमध्ये त्याने 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याच्या नेतृत्वात संघाने या 9 वनडे सामन्यांपैकी फक्त एका सामन्यात पराभव स्वीकारला.
मागच्या वर्षी खेळल्या गेलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक खेळला गेला. बाबर आझमने या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला अंतिम सामन्यापर्यंत नेले. पण बलाढ्य इंग्लंड संघाकडून अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला. (Babar Azam became the ICC Player of the Year)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राहुल-अथियाला भेटवस्तू देण्यासाठी विराटने खर्च केले दोन कोटी, धोनीनेही मोठ्या मानने दिले 80 लाखांचे खास गिफ्ट
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी भारतला मोठा झटका, धडाकेबाज फलंदाजची दुखापतीमुळे माघार