आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची पहिली लढत २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध पार पडणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. कारण गेल्या काही वर्षांपासून हे दोन्ही संघ द्विपक्षीय मालिका खेळताना दिसून येत नाही. हे संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमने सामने येत असतात. तत्पूर्वी त्यांना सराव सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वीच्या या पराभवाने खचून न जाता पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम याने मोठे वक्तव्य केले आहे.
बाबर आजमने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “जेव्हा आपण मोठी स्पर्धा खेळत असतो, त्यावेळी तुमचा आणि तुमच्या संघातील खेळाडूंचा तुमच्यावर किती विश्वास आहे हे फार महत्त्वाचे असते. माझ्या मते, एक संघ म्हणून आमचा आत्मविश्वास खूप उंचावला आहे. जे झाले आम्ही त्याचा विचार करत नाही, जे येणार आहे त्याचा आम्ही विचार करतोय. आम्हीही तशी तयारी करत आहोत. मला खात्री आहे की आम्ही तयार आहोत आणि सामन्याच्या दिवशी चांगले क्रिकेट खेळू.”
तसेच भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात काय रणनिती असेल? याबाबत बोलताना बाबर आजम म्हणाला, “भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये नेहमी हाय व्होल्टेज सामना होत असतो. एक खेळाडू म्हणून आणि एक संघ म्हणून आमचा प्रयत्न असेल की, आम्ही फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावं. सामन्याच्या दिवशी आम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. रणनिती तुम्ही माईंड सेटबद्दल करू शकतात. क्रिकेट तर सारखेच आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही दबाव कसा हाताळतात. हीच मोठी रणनिती असते.”
तसेच यूएईमध्ये खेळण्याबाबत बाबर आजम म्हणाला, “जेव्हापासून मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे. तेव्हापासून आम्ही यूएईमध्ये ३ ते ४ वर्ष क्रिकेट खेळलो आहे. आम्हाला इथल्या परिस्थितीबाबत चांगलच माहीत आहे. महत्वाचं म्हणजे तुम्ही सामन्याच्या दिवशी कसे खेळता.” हा सामना २४ ऑक्टोबर रोजी, संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात ‘हे’ भारतीय करतील सर्वाधिक धावा अन् घेतील सर्वाधिक विकेट्स, ब्रेट लीची भविष्यवाणी
कसं काय पुणे? भारतीय क्रिकेटर विराट कोहली पुण्यात सुरू करतोय ‘रेस्टो-बार’






