बाबज आझमला पाकिस्तानासह जगभारांपैकी सर्वश्रेष्ठ फलंदाजापैकी एक मानले जाते. तर शुबमन गिलला भारतीय क्रिकेटचा प्रिन्स म्हणतात. जर मागील तीन वर्षाबाबत बोलायचे झाल्यास एकदिवसीय सामन्यांमध्ये बाबर आझमपेक्षा शुबमन गिलची कामगिरी चांगली आहे.
गेल्या तीन वर्षांचा विचार केला तर भारताच्या या युवा स्टार फलंदाजाची ताकद बाबर आझमपेक्षा जास्त आहे. गिलने गेल्या तीन वर्षांत 44 सामने खेळले आहेत तर बाबरने 49 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. गिलने या 44 सामन्यांमध्ये 61.5 च्या सरासरीने 2279 धावा केल्या आहेत. तर बाबरने 50.9 च्या सरासरीने 2240 धावा केल्या आहेत. स्ट्राईक रेटमध्येही गिल बाबरच्या पुढे आहे. गिलचा स्ट्राइक रेट 102.8 तर बाबरचा 92.1 आहे. म्हणजे गिलने फक्त जास्त धावा केल्या नाहीत तर त्याचा स्ट्राईक रेटही बाबरपेक्षा चांगला आहे. गेल्या तीन वर्षांत बाबरने 14 अर्धशतके आणि 6 शतके झळकावली आहेत. तर गिलने 13 अर्धशतके आणि 6 शतके झळकावली आहेत.
कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर बाबरने 117 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 56.72 च्या सरासरीने 5729 धावा केल्या आहेत. त्याने 19 शतके आणि 32 अर्धशतके केली आहेत. त्याचा करिअरचा स्ट्राइक रेट 88.75 आहे. तर गिलने 47 एकदिवसीय सामन्यांमध्ये 58.20 च्या सरासरीने 2328 धावा केल्या आहेत. गिलने सहा शतके आणि 13 अर्धशतके केली आहेत. त्याने द्विशतकही झळकावले आहे. गिलचा करिअरचा स्ट्राइक रेट 101.74 आहे.
वास्तविक, शुबमन गिल आता दुलीप ट्राॅफीच्या तयारीला लागला आहे. कसोटी संघात आपले स्थान पक्के करण्यासाठी गिलला ही मालिका खुप महत्त्वाची असणार आहे. शुबमन गिलला भारत अ संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. ज्यामध्ये यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज सारख्या मोठ्या खेळाडूंचा सामवेश आहे.
हेही वाचा-
147 वर्षांच्या कसोटी इतिहासात असं प्रथमच घडलं! आशिया खंडाबाहेर श्रीलंकेच्या गोलंदाजांचा पराक्रम
‘एमएस धोनी सारखे आयुष्य जगायचे आहे..’, पुरस्कार सोहळ्यात कर्णधाराने व्यक्त केल्या भावना
मेगा लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या या 3 खेळाडूंवर टांगती तलवार, संघ रिटेन करणार का?