भारत आणि पाकिस्तान यांच्यात नेहमीच वैर राहिले आहे आणि अलीकडच्या काळात त्यात वाढ झाली आहे. दोन्ही संघ आता फक्त आयसीसी टूर्नामेंट किंवा आशिया चषकातच आमने-सामने येतात. जेव्हा एकदिवसीय विश्वचषकाचा विचार केला जातो, तेव्हा निश्चितपणे पाकिस्तानविरुद्ध भारताच्या वर्चस्वाचा उल्लेख होतो, भारताविरुद्ध पाकिस्तानला अद्याप एकही विजय मिळालेला नाही. त्यातच, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आपल्या संघाच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल आणि त्यांचे संपूर्ण लक्ष विजय मिळवण्यावर आणि भारताची विजयी मालिका संपवण्यावर असेल असं वक्तव्य केलं आहे.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला कधीही आनंद साजरा करण्याची संधी दिली नाही आणि संघाने सर्व 7 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव केला. आता भारतीय संघ आपला विक्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल, तर पाकिस्तान संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात असेल. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार बाबर आझम म्हणाला की, “भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर आपले लक्ष नाही आणि भारताचा विक्रम संपुष्टात आणण्याचा आपला प्रयत्न असेल.”
पुढे बोलताना बाबर म्हणाला, “भूतकाळात काय घडले यावर मला लक्ष द्यायचं नाही. पुढे काय होणार आहे यावर मला लक्ष केंद्रित करायचे आहे. रेकॉर्ड हे तुटण्यासाठी बनलेली असतात. आम्ही ते तोडण्याचा प्रयत्न करू. आम्हाला उद्या चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा निर्णय कोण चांगली कामगिरी करतो यावर अवलंबून आहे. मला विश्वास आहे की माझे संघ सहकारी चांगली कामगिरी करतील.”
2019 च्या विश्वचषकामध्येही भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. त्या सामन्यात भारतीय संघाने डीएलएसच्या मदतीने 89 धावांनी विजय मिळवला होता. भारतीय कर्णधार रोहित शर्माने शानदार शतक झळकावले होते. (Babar Azam eye-catching reaction before India-Pakistan match)
महत्वाच्या बातम्या –
‘गोलंदाजी आता त्यांची कमजोरी बनली आहे’, भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी दिग्गजाचं पाकिस्तान संघाविषयी मोठं वक्तव्य
BAN vs NZ । बोल्टपुढे ब्रेट ली पडला फिका! वनडेत 200 विकेट्स घेत नावावर केला नवा विक्रम