रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला. हा सामना ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर पार पडला. इंग्लंड आणि पाकिस्तान संघ टी20 विश्वचषकाच्या विजेतेपदासाठी आमने-सामने होते. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी यावेळी इंग्लंडच्या फलंदाजांना घाम फोडताना दिसले. मात्र, त्यांचा कर्णधार बाबर आझम याने निराशाजनक कारनामा केला.
पाकिस्तानचा डाव
टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेच्या अंतिम सामन्याची नाणेफेक इंग्लंड संघाने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच, पाकिस्तान संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी त्यांनी निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 137 धावा चोपल्या. यावेळी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने 28 चेंडूत 32 धावा केल्या. यामध्ये 2 चौकारांचाही समावेश होता.
Pakistan lose their captain as Adil Rashid picks up the big wicket of Babar Azam!#T20WorldCupFinal | #PAKvENG | 📝 https://t.co/jOrORwyWh1 pic.twitter.com/0swl5JRgpT
— T20 World Cup (@T20WorldCup) November 13, 2022
बाबर आझम टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत षटकार मारण्यात अपयशी
बाबरने या संपूर्ण स्पर्धेत एकूण 7 सामने खेळले. यातील 7 डावांमध्ये त्याने 17.71च्या सरासरीने 124 धावा केल्या. यामध्ये फक्त 1 अर्धशतकाचा समावेश होता. टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत बाबरने एकूण 133 चेंडूंचा सामना केला. यातील एकाही चेंडूवर त्याला षटकार मारता आला नाही.
आशिया चषकातही बाबर आझम अपयशी
याच वर्षी ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात पार पडलेल्या आशिया चषक 2022 स्पर्धेतही बाबर आझम अपयशी ठरला. या स्पर्धेत त्याने 6 सामने खेळताना 6 डावात 11.33 च्या सरासरीने फक्त 68 धावा केल्या. यावेळी त्याने एकूण 63 चेंडूंचा सामना केला, पण यामध्येही बाबर आझम षटकार मारण्यात अपयशी ठरला होता.
बाबर आझमने या दोन्ही स्पर्धेत मिळून 196 चेंडूंचा सामना केला. मात्र, यातील एकाही चेंडूवर त्याला षटकार खेचता आला नाही. त्यामुळे त्याच्या नावावर एकही षटकार न मारण्याचा नकोसा विक्रम नोंदवला गेला.
बाबर आझमची टी20 कारकीर्द
बाबर आझम याने पाकिस्तान संघाकडून 98 सामने खेळले आहेत. यातील 93 डावात त्याने 41.53च्या सरासरीने 3323 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 2 शतके आणि 30 अर्धशतकेही झळकावली आहेत. (Babar Azam Fail to hit six in t20 world cup and asia cup 2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंनी दंडावर का बांधली काळी पट्टी? ‘हे’ आहे कारण
‘काही लोकांचा चेहरा पुढच्या विश्वचषकात पाहायचा नाहीये’, विरेंद्र सेहवागची तिखट प्रतिक्रिया