पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम याने गेल्या वर्षात पाकिस्तान संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पाकिस्तान संघाला विजय मिळवून देण्यात त्याने अनेकदा महत्वाची भूमिका बजावली आहे. अशातच आगामी इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत तो लवकरच दिग्गज फलंदाज विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.
येत्या ८ जुलैपासून इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वनडे मालिकांचा थरार रंगणार आहे. या मालिकेत बाबर आजमला विराट कोहलीचा ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नावे आशिया खंडातील खेळाडू म्हणून वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी ९३ डावात ४००० धावांचा पल्ला गाठण्याचा विक्रम आहे. तर बाबर आजमने ७८ डावात ३८०८ धावा केल्या आहेत. यात त्याने १३ शतके आणि १७ अर्धशतके लगावली आहेत. विराट कोहलीचा हा विक्रम मोडून काढण्यासाठी बाबर आजमला अवघ्या १९२ धावांची आवश्यकता आहे. (Babar azam has an great opportunity to break Virat Kohli record)
इंग्लंडविरुद्ध केला होता विक्रम
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने २०१३ मध्ये ९३ डावात वनडे क्रिकेटमध्ये ४००० धावांचा पल्ला गाठला होता. त्याने हा पराक्रम रांचीच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात केला होता. या सामन्यात त्याने नाबाद ७७ धावांची खेळी केली होती.
हाशिम आमलाच्या नावे आहे कमी डावात ४००० धावा करण्याचा विक्रम
दक्षिण आफ्रिकन संघाचा विस्फोटक सलामीवीर फलंदाज हाशिम आमलाच्या नावे वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात ४००० धावा करण्याचा विक्रम आहे. आमलाने हा पराक्रम ८१ डावात केला होता.
असे असेल इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान मालिकेचे वेळापत्रक
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात होणारी ३ वनडे सामान्यांच्या मालिकेतील पहिला वनडे सामना ८ जुलै रोजी कार्डिफमध्ये खेळला जाणार आहे. तर दुसरा वनडे सामना १० जुलै रोजी लंडनमध्ये खेळला जाणार आहे. तसेच मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना १३ जुलै रोजी बर्मिंघममध्ये खेळाला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
एकेकाळच्या जग्गजेत्या श्रीलंकन संघाची आज का झाली आहे दारूण अवस्था? घ्या जाणून
इंग्लंड वि. श्रीलंका वनडे मालिका: श्रीलंकेचा व्हाईटवॉश हुकला, पावसामुळे तिसरा सामना रद्द
मानलं पाहिजे राव! दिल्लीकर फलंदाजाचा टी२०त धुमाकूळ, अवघ्या ७९ चेंडूत झळकावले द्विशतक