न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघासाठी मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे संघाला मोठा धक्का बसला आहे.
सरावादरम्यान बाबर आझमच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला मोठी दुखापत झाल्यामुळे तो टी२० मालिकेतून बाहेर पडला आहे. पाकिस्तान संघ आता आझमच्या अनुपस्थितीत कोणाकडे कर्णधारपद सोपवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
या दौऱ्यात पाकिस्तान संघाला न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची टी२० मालिका आणि २ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
यातील पहिला टी२० सामना १८ डिसेंबरला ऑकलँड येथे खेळण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरा सामना २० आणि तिसरा सामना २२ डिसेंबरला खेळण्यात येणार आहे.
त्यानंतर कसोटी मालिकेला सुरुवात होईल. यातील पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सुरू होईल, तर दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना ३ जानेवारीपासून खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तुझ्या घरचेही तुझ्याबद्दल…’, ट्रोल करणाऱ्या चाहत्याला ‘गब्बर’चा दणका
…तर ऑस्ट्रेलिया ४-० ने मालिका जिंकेल, माजी दिग्गज कर्णधाराची भविष्यवाणी
“भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यास सज्ज”, कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे वक्तव्य