---Advertisement---

एकेवेळी पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानचा कर्णधार म्हणतोय, ‘आता आम्हाला चढलाय जोश’

Captain-Babar-Azam
---Advertisement---

बाबर आझम याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने विश्वचषकाच्या उपांत्यफेरीत नाटकीयरीत्या प्रवेश केला आहे. पाकिस्तान संघाने रविवारी (दि. 6 नोव्हेंबर) बांगलादेशवर 5 गडी राखून मात केली. पाकिस्तानचा उपांत्य फेरीत पोहचण्याचा मार्ग नेदरलँड्सने खुला केला. नेदरलँड्सने मोठा उलटफेर करत दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला.

टी20 विश्वचषक 2022च्या उपांत्यफेरीत पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. न्यूझीलंड संघ गट-1 मध्ये 7 अंकासोबत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा संघ 6 अंकांसोबत गट-2 मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच, गुरूवारी (दि. 10 नोव्हेंबर) दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि इंग्लंड आमने-सामने असणार आहेत. टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) मेलबर्न येथे खेळला जाईल.

पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहचल्यानंतर कर्णधार बाबर आझम (Babar Azam) अत्यंत उत्साहित दिसला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात बाबर बांगलादेश विरुद्धच्या विजयानंतर संघाला संंबोधित करताना दिसला. त्यात तो म्हटलाय की, “आम्ही कधीच अपेक्षा सोडली नाही, आमच्या आशा पल्लवीत झालेल्या, पण आम्ही कधीच उत्साहित झालो नाही. मागच्या दोन सामन्यात आमच्या संघाने ज्या प्रकारचे प्रदर्शन केले आहे, तशाच प्रदर्शनाची पुनरावृत्ती पुढच्या सामन्यात करावी लागेल.” यावेळी त्याने युवा फलंदाज मोहम्मद हॅरिस याला त्याच्या चुकांबद्दलही सांगितले.

सामना जिंकून परत जावे लागेल
पाकिस्तानचा फलंदाज फखर झमान दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी मोहम्मद हॅरिस याला सामील करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने 255च्या स्ट्राईक रेटने 28 आणि बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात 18 चेंडूत 31 धावा केल्या होत्या. 21 वर्षीय हा युवा खेळाडू पहिल्यांदाच विश्वचषकात खेळतोय. बाबरने म्हटलंय की, “हॅरिसने चांगले प्रदर्शन केले आहे. मात्र, जेव्हा तुम्ही सामना जिंकून परत जाता, तेव्हा तुमचा आत्मविश्वास बऱ्याच पटीने वाढलेला असतो.”

अशात, पाकिस्तान संघ टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचतो की, नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशचं नशीबच खराब! थर्ड अंपायरच्या चुकीमुळे कर्णधाराला पकडावा लागला तंबूचा रस्ता
ज्यांना चाहते मानायचे आदर्श, त्याच खेळाडूंनी केली होती हद्द पार; सेक्स स्कँडलमध्ये अडकल्याने लागलेली वाट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---