काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान संघाचा फलंदाज बाबर आझमला वनडे व टी२० सोबतच कसोटी संघाचेदेखील कर्णधारपद देण्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळ तसेच पाकिस्तानी जनतेलादेखील बाबरकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. यातच पाकिस्तानचे माजी कर्णधार राशिद लतिफ यांनी बाबरची स्तुती करत त्याला भारतीय कर्णधार विराट कोहलीकडून काही बाबी शिकणे गरजेचे आहे, असे मत मांडले आहे.
आपल्या यूटयूब चॅनेलवर बोलतांना लतिफ म्हणाले, “बाबरने हळू- हळू कर्णधार होण्याबरोबरच विराटप्रमाणे एक नेतृत्त्वकर्ता देखील बनावे. कोणत्याही खेळामध्ये कर्णधार बनल्यानंतर कर्णधाराने नेतृत्त्वकर्ता बनने गरजेचे असते.”
लतिफ पुढे म्हणाले की, “बाबरला जर अधिक वेळ कर्णधार बबून राहायचे असेल, तर त्याने विराटकडून शिकावे. विराट एक कर्णधारासोबतच नेतृत्त्वकर्ता देखील बनला आहे. नेतृत्त्वकर्ता बानताना विराटला त्याच्या मैदानावरील उत्तम कामगिरीची देखील मदत होते.”
बाबर आझमच्या नेतृत्त्वात आगामी काळात पाकिस्तानला दक्षिण अफ्रिकेसोबत मायदेशात महत्त्वाची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेत सर्वांच्या नजरा कर्णधार बाबर आझमकडे असतील.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडला दणका! श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून २ मोठे खेळाडू बाहेर
हम खुद के फेवरेट है.! ऐतिहासिक खेळीनंतर बुमराहचं स्वतःसाठी खास ट्विट
कसं काय, हार्दिक भाऊ? पंड्याचा मराठी बोलतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ‘हे’ ३ गोलंदाज लढवणार भारताची खिंड; स्पिनरचाही समावेश
भारतीय संघाची अष्टपैलूची चिंता कोण मिटवणार? ‘या’ ५ खेळाडूंचे आहेत पर्याय