---Advertisement---

‘आता तू सुद्धा सुरु झालास का?’; गोलंदाजांच्या नो बॉलला कंटाळून कर्णधार आझमची मजेशीर रिऍक्शन

On: बुधवार, ऑगस्ट 25, 2021 9:24 PM
---Advertisement---

वेस्टइंडीज आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिका नुकतीच पार पडली आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना वेस्टइंडीजने १ विकेटने जिंकला आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने वेस्टइंडीजला १०९ धावांनी मात दिली आहे. हा सामना जमैकाच्या सबीना पार्क मैदानावर खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने मिळवलेल्या विजयानंतर मालिका १-१ अशा बरोबरीत संपली आहे. दरम्यान दुसऱ्या सामन्यातील एक व्हिडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे.

पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज नुमान अलीने गोलंदाजीदरम्यान ४१ व्या षटकातला ५ वा चेंडू नो बाॅल फेकला. नुमान अलीने फेकलेल्या नो बाॅलनंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमची रिऍक्शन पाहण्यासारखी होती. व्हिडिओत दिसत आहे की, बाबर आजमने त्याच्या मस्तीच्या अंदाजामध्ये नुमान अलीला म्हटले, “काय नौमी आता तू पण सुरू झाला का?”

नुमान अलीने सामन्यातील दुसऱ्या डावादरम्यान २ नो बाॅल टाकले होते. त्याच्या व्यतिरिक्त सामन्यात अशरफने २ आणि हसन अलीने १ नो बाॅल फेकला होता. सामन्यातील पहिल्या डावाचा विचार केला तर त्यातही पाकिस्तानचा संघ गोलंदाजांनी फेकलेल्या नो बाॅलमुळे त्रस्त झाला होता. पहिल्या डावात हसन अलीने ३ तसेच शाहीन अफरीदी, अशरफ आणि नुमान अलीने प्रत्येकी १ नो बाॅल फेकला होता.

जर कसोटी मालिकेचा विचार केला तर, वेस्टइंडीजने मालिकेतील पहिला सामना याच मैदानावर १ विकेटने जिंकला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने अप्रतिम प्रदर्शन केले. त्याने या सामन्यात १० विकेट घेतल्या आहेत.

शाहीन आफ्रिदीला या सामन्यातील कामगिरीसाठी सामनावीर निवडले गेले आणि मालिकावीर म्हणूनही त्यालाच निवडले गेले आहे. नुमान अलीनेही या सामन्यात चांगली गोलंदाजी केली आहे. त्याला या सामन्यातच्या पहिल्या डावात एकही विकेट मिळवता आला नव्हता. पण, दुसऱ्या डावात त्याने वेस्टइंडीजच्या ३ विकेट मिळवल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

त्याला स्वत:च्या रंगात रंगलेले पाहून आनंद झाला, तो डोळ्यांत डोळे घालून खेळणारा गोलंदाज – विराट कोहली

दक्षिण आफ्रिकेचा ‘जादुई गोलंदाज’ राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात! जागतिक टी-20 क्रमवारीत आहे अव्वलस्थानी

अरे कोहली, तुला नेमकं झालंय काय? ‘रनमशीन’बाबत ही गोष्ट वाचून हैराण व्हाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---