---Advertisement---

‘बाबरचे वादळ रोखणं होतंय कठीण!’ मागील ८ पैकी ७ सामन्यात झळकावलंय अर्धशतक, वाचा रेकॉर्ड्स

On: बुधवार, ऑगस्ट 17, 2022 11:40 AM
Babar-Azam
---Advertisement---

बाबर आझमची वनडेत चांगली कामगिरी सुरूच आहे. पाकिस्तानच्या कर्णधाराने नेदरलँड विरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात ७४ धावा केल्या. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील २०वे अर्धशतक आहे. मात्र, त्याचे १८वे शतक हुकले. आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या बाबरने गेल्या ८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. यादरम्यान ४ शतकेही झळकावली आहेत. या सामन्यात प्रथम खेळताना पाकिस्तानने ६ गड्यांच्या मोबदल्यात ३१४ धावा केल्या होत्या. सलामीवीर फलंदाज फखर जमानने शतक झळकावले. प्रत्युत्तरात यजमान नेदरलँड्सला ८ विकेट्सवर २९८ धावाच करता आल्या. अशा प्रकारे पाकिस्तानने १६ धावांनी विजय मिळवला.

बाबर आझमने नेदरलँडविरुद्ध ८५ चेंडूत ७४ धावा केल्या. स्ट्राइक रेट ८७ होता. ६ चौकार आणि १ षटकार मारला. याआधी एकदिवसीय सामन्यांच्या शेवटच्या ७ डावांमध्ये त्याने १५८, ५७, ११४, १०५*, १०३, ७७ आणि एक धावा केल्या होत्या. २७ वर्षीय बाबरने ९० एकदिवसीय सामन्यांच्या ८८ डावांमध्ये ६०च्या सरासरीने ४५१६ धावा केल्या आहेत. त्याने १७ शतके आणि २० अर्धशतके केली आहेत. त्याने १५८ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली आहे.

https://twitter.com/FanCode/status/1559519533420855297?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1559519533420855297%7Ctwgr%5Ec8aed5859d0e5def423dbf0e8f7dc76cdfc74ce9%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-ned-vs-pak-babar-azam-scored-more-than-50-runs-7-times-in-the-last-8-innings-of-odis-video-4475780.html

हाशिम आमलाचा विक्रम मोडीत
बाबर आझमने डावात दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम आमलाचा ​​मोठा विक्रमही मागे टाकला. तो एकदिवसीय सामन्यांच्या पहिल्या ८८ डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. याआधी आमलाने ४४७३ धावा केल्या होत्या. बाबरच्या ४५१६ धावा आहेत. त्याच वेळी, वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज विवियन रिचर्ड्सने ४०३८ धावा केल्या तर वेस्ट इंडिजच्या शाई होपने ४०२६ धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला पहिल्या ८८ डावात ४००० धावांचा टप्पा गाठता आला नाही.

बाबर आझम हा टी-२० मध्ये जगातील नंबर १ फलंदाज देखील आहे. २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये त्यांना चांगली कामगिरी करायची आहे. त्याने आतापर्यंत ७४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४६च्या सरासरीने २६८६ धावा केल्या आहेत. त्याने एक शतक आणि २६ अर्धशतके केली आहेत. १२२ धावांची सर्वोत्तम खेळी. त्याने ४२ कसोटीत ४७च्या सरासरीने ३१२२ धावा केल्या आहेत. त्याने ७ शतके आणि २३ अर्धशतके केली आहेत.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘शिखर धवनसोबत कोणता खेळाडू करणार ओपनिंग?’ माजी दिग्गजाने दिलंय उत्तर

दिग्गज क्रीडापटू ऍलेक्स सिल्व्हेरा आणि सतिंदरपाल वालिया यांचा रेल्वेकडून गौरव

दिग्गज क्रीडापटू ऍलेक्स सिल्व्हेरा आणि सतिंदरपाल वालिया यांचा रेल्वेकडून गौरव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---