पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने खराब फॉर्ममध्ये झगडत असलेल्या भारतीय फलंदाज विराट कोहलीचे समर्थन केले आहे. त्याने गुरुवारी रात्री १२.३० वाजता एक ट्विट केले ज्यामध्ये त्याने विराटसोबतचा त्याचा जुना फोटो शेअर केला. त्यानंतर लॉर्ड्सवर भारत आणि इंग्लंड यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जात होता. अशा स्थितीत वेळ पाहता बाबर हा सामना पाहत असल्याचे मानले जात आहे. बाबरने श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी पत्रकार परिषदेतही याबाबत चर्चा केली.
अनेक दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंज देत असलेल्या विराट कोहलीच्या समर्थनार्थ पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने ट्विट केले आहे. त्यामुळे कट्टर प्रतिस्पर्धी असूनही तो खेळ आणि खेळाडूंचा आदर करतो, असे कौतुकही केले होते. बाबर यांनी गुरुवारी रात्री उशिरा हे ट्विट केले. त्यामागचे कारण त्यांनी आता दिले आहे.
बाबरने गुरुवारी रात्री १२.३० वाजता एका ट्विटमध्ये विराट कोहलीचा बचाव केला होता. त्यांनी लिहिले, ‘हा टप्पाही निघून जाईल. खंबीर राहा.” त्याने विराट आणि स्वतःचा एक जुना फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये माजी भारतीय कर्णधार खांद्यावर हात ठेवून उभा आहे.
This too shall pass. Stay strong. #ViratKohli pic.twitter.com/ozr7BFFgXt
— Babar Azam (@babarazam258) July 14, 2022
या वाईट टप्प्यातून बाहेर पडण्यासाठी भारताच्या माजी कर्णधार विराटला सर्वांच्या पाठिंब्याची गरज असल्याचं बाबर आझम यांनी म्हटलं आहे. कोहलीने जवळपास ३ वर्षांपासून एकही शतक झळकावलेले नाही. चाहते त्याच्या ७१व्या शतकाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यामुळे त्याला संघातून बाहेर करण्याची की विश्रांती देण्याची चर्चा रंगली आहे. इंग्लंडमधील मर्यादित षटकांच्या मालिकेत त्याला आतापर्यंत मोठी खेळी करता आलेली नाही.
दरम्यान, विराट कोहलीला यावर्षी खेळल्या गेलेल्या ७ एकदिवसीय सामन्यांमध्ये केवळ १५८धावा करता आल्या आहेत, ज्यामध्ये केवळ २ अर्धशतकांचा समावेश आहे. तो आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत बाबर आणि पाकिस्तानच्या इमाम-उल-हक यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीचा पठ्ठ्या टी२०त गाजतोय! केवळ १९ चेंडूत १०० धावा करत गाजवलंय मैदान
आता ठरलंय! ‘हे’ १२ संघ खेळणार आयसीसी टी२० विश्वचषक, वाचा कधी आणि कुणाशी भिडणार भारत
बीएसएएम’कडून राष्ट्रीय पदकविजेते आणि अध्यक्ष राजन खिंवसरा यांचा सत्कार