---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का; बाबर आझमने कर्णधारपद सोडले

On: बुधवार, ऑक्टोबर 2, 2024 7:06 AM
---Advertisement---

ताकदवान फलंदाज बाबर आझमने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या वनडे आणि टी20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे. बाबर आझमने आपला राजीनामा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे सुपूर्द केला आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतरही त्याने हे केले होते. परंतु नंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुन्हा त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. परंतु पुन्हा एकदा त्याने राजीनामा देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. यावेळी त्याने राजीनामा देण्यामागे आपल्या खराब कामगिरीचा ठपका ठेवला असून आपल्याला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचे असल्याचे सांगितले.

बाबर आझमने काल (01 ऑक्टोबर) रात्री उशिरा केलेल्या एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्याच्या चाहत्यांना कळवले आहे की तो कर्णधारपद सोडत आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की “या संघाचे नेतृत्व करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. परंतु आता वेळ आली आहे की पद सोडण्याची आणि माझ्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करण्याची.”

त्याने पुढे लिहिले की, “कर्णधारपद हा खूप चांगला अनुभव आहे. पण त्यामुळे कामाचा ताणही वाढला आहे. मला माझ्या कामगिरीला प्राधान्य द्यायचे आहे. माझ्या फलंदाजीचा आनंद घ्यायचा आहे आणि माझ्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवायचा आहे. जेणेकरून मला आनंद मिळेल. पुढे जाण्यासाठी आणि माझ्या खेळावर आणि वैयक्तिक विकासावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी मी तुमचा अतूट पाठिंबा आणि माझ्यावरील विश्वासाबद्दल कृतज्ञ आहे. एक खेळाडू म्हणून संघासाठी योगदान देण्यास मी उत्सुक आहे. तुमच्या प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद.”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Babar Azam (@babarazam)

2023 च्या विश्वचषकात पाकिस्तान संघाच्या खराब कामगिरीनंतर त्याला कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर पीसीबीने शाहीन शाह आफ्रिदीकडे कर्णधारपद सोपवले. परंतु काही सामन्यांनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुन्हा एकदा पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटचे कर्णधारपद बाबर आझमकडे दिले आणि हे धोरणात्मक पाऊल असल्याचे सांगितले. यामुळे शाहीन आफ्रिदी नाराज दिसला होता. मात्र आता कर्णधार कोण असेल याचा निर्णय लवकरच घेतला जाणार असला तरी सध्या पाकिस्तान संघाचे लक्ष इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेवर आहे.

हेही वाचा-

भारतासाठी सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारे टाॅप-5 कर्णधार
भारताच्या खतरनाक विजयानंतर बांगलादेश प्रशिक्षक म्हणाले, “अशी आक्रमक वृत्ती…”
VIDEO; वर्षांनंतर बाप-लेकीची भेट! क्षणीच भावूक झाला ‘हा’ स्टार क्रिकेटपटू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---