रविवारी (२४ ऑक्टोबर) आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु पाकिस्तान संघाने अप्रतिम गोलंदाजी आणि फलंदाजी करून भारतीय संघावर १० गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर संपूर्ण पाकिस्तानमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. तर सामन्यानंतर कर्णधार बाबर आजमचे वडील देखील भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
हा मोठा सामना पाहण्यासाठी बाबर आजमच्या वडिलांनी देखील मैदानात हजेरी लावली होती. आपल्याच मुलाने पाकिस्तान संघाला भारताविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवून दिला, हे पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते स्टँड्समध्ये बसून रडताना दिसून येत आहेत.
हा विजय पाकिस्तान संघासाठी खूप मोठा विजय आहे. कारण पाकिस्तान संघाला आतापर्यंत एकदाही टी -२० विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध विजय मिळवण्यात यश आले नव्हते. या विजयानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजमने देखील आपल्या चाहत्यांना एक संदेश दिला. ज्यामध्ये तो म्हणाला, “संपूर्ण जगभरात या सामन्याची वाट पाहिली जात होती. मी सर्व चाहत्यांचे आभार मानतो, ज्यांनी आम्हाला समर्थन केले.” हा व्हिडीओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
This is Babar Azam’s father. So happy for him. I first met him in 2012 at Adnan Akmal’s walima. Babar at that time was 3 years away from Pakistan debut. I clearly remember what his father told me “bas debut ho jane do. Agay sara maidaan babar ka hai” pic.twitter.com/ZlsvODQkSg
— Mazher Arshad (@MazherArshad) October 24, 2021
The captain has a special message for Pakistan fans!#WeHaveWeWill pic.twitter.com/XxSZcSai85
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 24, 2021
या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून कर्णधार विराट कोहलीने ५७ धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने ३९ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २० षटक अखेर ७ बाद १५१ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाकडून मोहम्मद रिजवानने नाबाद ७९ आणि बाबर आजमने नाबाद ६८ धावा करत पाकिस्तान संघाला १० गडी राखून विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी घेतला सामन्याचा आस्वाद; विजयानंतर दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
भारताला आफ्रिदी नडला! रोहित, राहुल अन् विराटच्या विकेट घेत दिले मोठे धक्के, पाहा व्हिडिओ