पाकिस्तान संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या बाहेर पडला आहे. भारतीय संघाकडून हारल्यानंतर यजमान पाकिस्तान संघाचा सेमीफायनल संघात पोहोचण्याचा मार्ग कठीण झाला होता. त्यानंतर न्युझीलँड संघाने बांगलादेशला हरवून अधिकृतरित्या पाकिस्तान आणि बांगलादेश संघाला स्पर्धेच्या बाहेर केले. आता पाकिस्तानी संघाचे माजी खेळाडू पाकिस्तान संघावर खूप निराशा व्यक्त करत आहेत. शब्दांमधून टीका करत आहेत, त्यातच पाकिस्तान संघाचे माजी खेळाडू शोएब अख्तर यांनी बाबर आझम आणि पूर्ण पाकिस्तान संघावर टीका करत त्यांना विराट कोहलीचे उदाहरण दिलेले आहे.
एका टीव्ही कार्यक्रमात शोएब अख्तर बाबर आझमवर टीका करत म्हटले की, बाबर आझमने त्याचा आदर्श चुकीच्या व्यक्तीला मानले आहे. ते म्हणाले, “विराट कोहलीचा हिरो कोण आहे? सचिन तेंडुलकर. सचिनने 100 शतके केली आहेत. बाबर आझमचा हिरो कोण आहे? टुक टुक क्रिकेटर म्हणत त्यांनी कोणत्याही खेळाडूचे नाव घेतले नाही.
शोएब अख्तर पुढे म्हणाले की, जर तुम्ही चुकीच्या व्यक्तीलाच तुमचा आदर्श मानता तर तुमचे विचार चुकीचे आहेत. तुम्ही सुरुवातीपासूनच नखली आहात. तुम्ही दीड दिवसात म्हणले की पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे. तुम्ही तुमचा आदर्श चुकीचा बनवला आहे आणि तुम्ही चुकीच्या लोकांना बरोबर बोलत आहात.
पाकिस्तानच्या सोशल मीडिया अकाउंट वर खूप चेष्टा होत आहे. खूप दिवसानंतर यजमानपद स्वीकारणारा पाकिस्तान संघ स्पर्धेमधून पाच दिवसातच बाहेर पडला आहे. भारतीय संघाकडून 6 विकेट्सने तर न्यूझीलंड संघाने त्यांचा 60 धावांनी पराभव केला होता.
पाकिस्तान संघ अ गटात सामील आहे. तसेच या गटात भारत, न्यूझीलंड आणि बांगलादेश संघ आहेत. या गटातील न्युझीलँड आणि भारतीय संघाने सेमीफायनल सामन्यात क्वालिफाय केले आहे.
हेही वाचा
“विराट कोहली सर्वकालीन महान वनडे खेळाडू” इंग्लंडच्या माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य
“सेमीफायनलपूर्वी महाभारत! भारताच्या सामन्यावर ठरेल तीन संघांचे भविष्य”
“आमची मदत धोनीही करू शकत नाही!” – पाक महिला संघाच्या माजी कर्णधाराचा संताप






