---Advertisement---

‘दंगल गर्ल’ बबिता फोगटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, खास ट्विट करत दिली माहिती

On: मंगळवार, जानेवारी 12, 2021 3:08 PM
---Advertisement---

भारताची स्टार कुस्तीपटू बबिता फोगट हिला सोमवारी (११ जानेवारी) पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. तिने पती विवेक सुहाग व चिमुकल्या पाहुण्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत सर्वांना ही गोड बातमी दिली आहे.

आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर फोटो शेअर करत तिने खास संदेश लिहिला आहे. “आमच्या SONshine ला भेटा. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवत जा, स्वप्ने नक्कीच खरी होतात. आमचे स्वप्न या निळ्या कपड्यात असलेल्या गोंडस बाळाच्या रुपात पुर्ण झाले आहे,” असे तिने ट्विटमध्ये लिहिले आहे. विशेष म्हणजे, आपल्या नवजात बाळाप्रमाणेच बबिता फोगटनेही निळ्या रंगाचे वस्त्र घातले असल्याचे फोटोत दिसत आहे.

२०१९ मध्ये बांधली लग्नगाठ

बबिता फोगाट आणि पती विवेक सुहाग हे दोघेही कुस्तीपटू आहेत. २०१४ मध्ये त्यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २ डिसेंबर २०१९ मध्ये त्यांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली. पुढे नोव्हेंबर २०२० मध्ये इंस्टाग्रामवर आपला एक फोटो शेअर केला होता. यासोबतच तिने आपण आपल्या जिवनाचा नवा अध्याय सुरु करण्यास उत्त्सुक असल्याचे सांगितले होते.

बबिता फोगटची कारकिर्द

बबिता फोगटने २०१४ साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. सोबतच तिला दोन रौप्यपदकेही मिळाली होती. तसेच जागतिक कुस्ती स्पर्धेत ती कांस्यपदकाची मानकरी ठरली होती. तिच्या या कामगिरीनंतर हरियाणा सरकारने तिला उपनिरीक्षकाची नोकरी दिली होती. मात्र काही कारणास्तव तिने ती नोकरी सोडली.

बबिता फोगट सध्या हरियाणा महिला विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावर आहे. २०१९ सालच्या हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत तिला भाजपाकडून तिकीट देण्यात आले होते. मात्र तिचा या निवडणुकीत पराभव झाला.

महत्त्वाच्या बातम्या-

शुभमंगल सावधान! अर्जूनवीर कुस्तीपटू राहुल आवारे अडकला लग्नबंधनात

आखाडा पुन्हा गाजणार! महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनास राज्य शासनाची परवानगी

संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---